स्वित्झर्लंड : वृतसंस्था – वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये जपानच्या नोझोमी ओकुहाराविरुद्ध सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीसाठी उरलेल्या पी. व्ही. सिंधूने लौकिकास साजेसा खेळ करत सुवर्णपदक मिळवले आहे. सिंधूने बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप २०१९ च्या अंतिम सामन्यात सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला आहे कारण बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी महिला व पुरुष गटात कुणीही भारतासाठी सुवर्णपदक जिंकलेले नाही. सिंधूने भारतासाठी ऑलिम्पिक रौप्यपदक मिळविले आहे.
https://twitter.com/SurbhiJadmirer/status/1165604896243994626
याआधी काल बनविले होते अनेक विक्रम
वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये जपानच्या नोझोमी ओकुहाराविरुद्ध अंतिम फेरीसाठी कोर्टात पाऊल ठेवण्यापूर्वी पीव्ही सिंधूने अनेक विक्रम नोंदवले आहेत. तिने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पाच पदक जिंकून महान झांग निंगच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. हे तिचे सलग तिसरे अंतिम फायनल होते, हे स्वतःमधील एक पराक्रम आहे. स्वित्झर्लंडमधील वर्ल्ड चॅम्पियनशिपचे ठिकाण बासेल येथील एनडीटीव्हीशी बोलताना सिंधू म्हणाल्या की, सर्व जागतिक स्पर्धा वेगवेगळ्या वातावरणात खेळल्या जाणार्या वेगवेगळे टूर्नामेंट आहेत आणि यावेळी ती पदकाचा रंग बदलू शकेल अशी अपेक्षा आहे.
घेतला यापूर्वीच्या पराभवाचा बदला
२०१७ मध्ये झालेल्या विश्व चॅम्पियन स्पर्धेत नाओमी ओकुहारानं सिंधूला हरवले होते. या दोघांमध्ये आतापर्यंत १५ सामने झाले आहे. त्यातील ८ सामन्यात सिंधूने विजय मिळवला आहे. त्यावेळी सिंधू आणि ओकुहारा यांच्यात तब्बल ११० मिनीटे सामना चालला होता. वर्ल्ड चॅम्पियनशीपच्या इतिहासतला हा सर्वात मोठा अंतिम सामना होता. यात ७३ शॉट्सची रॅली झाली होती. यात डोळ्याचे पारणे फेडणारी लढत सिंधूने दिली होती मात्र तिला पराभवास सामोरे जावे लागले होते.
PV Sindhu beats Japan's Nozomi Okuhara 21-7, 21-7; becomes 1st Indian to win BWF World Championships gold medal. (file pic) pic.twitter.com/SNHfvka84A
— ANI (@ANI) August 25, 2019