Women’s T20 Asia Cup 2022 | महिला आशिया चषकात भारतीय महिला वरचढ, जाणून घ्या बाकीच्या संघाची स्थिती
सिल्हेट : वृत्तसंस्था – सध्या बांगलादेशमध्ये (Bangladesh) महिला आशिया चषक (Women’s T20 Asia Cup) सुरु आहे. या चषकात भारतीय संघाने स्पर्धेतील सलामीचे तिन्ही सामने जिंकून विजयाची हॅटट्रिक (Hatrick) केली आहे. या स्पर्धेला 1 ऑक्टोबरपासून सुरवात झाली आहे. या स्पर्धेतील सर्व संघ एकमेकांविरुद्ध एक सामना खेळतील. यानंतर अव्वल चार संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील आणि दोन्ही उपांत्य फेरीतील विजेत्या संघांमध्ये 15 ऑक्टोबर रोजी फायनल मॅच होईल. (Women’s T20 Asia Cup)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
या स्पर्धेमध्ये भारतीय संघाने सर्वाधिक 6 वेळा आशिया चषकाचा (Asia Cup) किताब पटकावला आहे. या स्पर्धेत भारताने सध्या तरी आपले वर्चस्व राखले आहे. या स्पर्धेत पाकिस्तानचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांनी 3 सामन्यांमधील 2 सामने जिंकले आहेत. या स्पर्धेत भारत(India), पाकिस्तान (Pakistan), श्रीलंका (Srilanka), थायलंड (Thailand), मलेशिया (Malaysia), यूएई (UAE) आणि यजमान बांगलादेश (Bangladesh) हे सात सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत भारत 7 व्यांदा आशिया चषकाचा ‘किताब जिंकतो का ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
पॉईंट टेबल
स्थान संघ सामने विजय पराभव गुण
1 भारत 3 3 0 6
2 पाकिस्तान 3 2 1 4
3 श्रीलंका 3 2 1 4
4 बांगलादेश 2 1 1 2
5 थायलंड 3 2 2 2
6 यूएई 3 2 2 2
7 मलेशिया 3 0 3 0
Web Title :- Women’s T20 Asia Cup 2022 | indian team is at the top position in womens asia cup points table with 3 wins
हे देखील वाचा :
Beed Crime | प्रेमाचे नाटक करुन महिला पोलीस अंमलदारावर अत्याचार, ब्लॅकमेल करत उकळले तब्बल 13 लाख
Heartburn | छातीत जळजळ किंवा Heartburn का होते, जाणून घ्या याची लक्षणे आणि बचावाचे उपाय
Comments are closed.