चंद्रपूर : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाच्या वतीने २३ फेब्रुवारी रोजी छत्रीय माळी समाज भवन चंद्रपूर येथे महिला मेळावा, स्नेहमिलन सोहळा आणि उपवर-उपवधू परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा जिल्हा शाखेच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, राज्याचे अर्थ, नियोजन व वनेमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.
अध्यक्षस्थानी महाराष्ट्र कुंभार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते राहणार असून, याप्रसंगी आमदार नानाजी श्यामकुळे, जि.प.अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, किशोर जोरगेवार, शीतल गाते, सुरेश हिरे, सुरेश कोते, महासंघाचे प्रदेश सरचिटणीस सुभाष तेटवार, सतीश देरकर, चंदन प्रजापती, गोपाल बनकर आदींची उपस्थिती राहणार आहे. या मेळाव्याला समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन एकनाथ बुरबांधे, गोपीचंद ठाकरे, रमेश बुरबांधे, सुरेश चितवे, भार्गवी गाते, रामकला मालदे, संगीता गिरोले, सुरेखा ठाकरे आदींनी केले आहे.