Womens Asia Cup | टीम इंडियाने मलेशियाविरुद्धच्या सामन्यात आशिया कपमध्ये केला ‘हा’ नवा रेकॉर्ड
बांगलादेश : वृत्तसंस्था – सध्या बांग्लादेशमध्ये (Bangladesh) महिलांचा आशिया चषक (Womens Asia Cup) सुरू आहे. यामध्ये सलामीच्या सामन्यात भारताने श्रीलंकेला हरवून जोरदार सुरुवात केली. आज स्पर्धेच्या दुसऱ्या साखळी सामन्यात भारताचा (India) सामना मलेशियाशी (Malaysia) झाला. या सामन्यासाठी भारताने संघात मोठे बदल केले. या सामन्यात स्मृती मंधानाला (Smriti Mandhana) विश्रांती देण्यात आली. तर स्वत: हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) आणि गेल्या मॅचची मॅन ऑफ द मॅच (Man of The Match) जेमिमा रॉड्रिग्स (Jemima Rodrigues) बॅटिंगसाठी मैदानात उतरलेच नाही. तरीदेखील भारताने हा सामना डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे 30 धावांनी जिंकला. या सामन्यात भारताने वुमन्स आशिया कपमध्ये एक मोठा विक्रम रचला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
https://twitter.com/BCCIWomen/status/1576846752228945920
शफाली-मेघनाची शतकी सलामी
या सामन्यात मेघना (Meghana Singh) आणि शफालीनं (Shafali Verma) आक्रमक सुरुवात करताना भारताला 116 धावांची सलामी करून दिली. मेघना 69 धावा काढून बाद झाली. तर शफालीनं 39 बॉल्समध्ये 46 धावा केल्या. या दोघी बाद झाल्यावर विकेट किपर रिचा घोषनं (Richa Ghosh) फटकेबाजी करताना 19 बॉल्समध्ये नाबाद 33 धावा ठोकल्या. त्यामुळे भारतानं 20 ओव्हरमध्ये 181 धावा केल्या. आशिया कपमध्ये (Womens Asia Cup) टी20 फॉरमॅटमधली आजवरची ही सर्वोच्च धावसंख्या ठरली.
https://twitter.com/BCCIWomen/status/1576867555524116481
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
या सामन्यात पावसानं व्यत्यय आणला. दिप्ती शर्मा (Dipti Sharma) आणि राजेश्वरी गायकवाडच्या
(Rajeshwari Gayakwad) फिरकीसमोर मलेशियाची 5.2 ओव्हरमध्ये 2 बाद 16 अशी अवस्था झाली होती.
त्याचवेळी पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबवण्यात आला. मात्र पाऊस जास्त असल्यामुळे पुढील सामना झाला नाही.
यानंतर अम्पायर्सनी डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारे भारताला 30 धावांनी विजयी घोषित केले.
Web Title :- Womens Asia Cup | indian womens team played like a practice match against malesia in asia cup sport news
हे देखील वाचा :
Solapur Crime | धक्कादायक! सोलापूरमध्ये तरुणाचा धारदार शस्त्राने खून; तळे हिप्परगा येथील घटना
Comments are closed.