पुणे : बहुजननामा ऑनलाइन – कुटुंबाचा भार सांभाळत असताना महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यांनी स्वतःच्या आरोग्यासाठी दररोज एक तास चालण्याचा व्यायाम करावा, निरोगी आरोग्य मोठी संपत्ती आहे. सर्वच क्षेत्रात महिलांचे नेतृत्व उल्लेखनीय आहे, असे मत माजी महापौर वैशाली बनकर यांनी व्यक्त केले.
हडपसरमधील चंद्रमौळेश्वर महादेव मंदिरामध्ये अपघाती विमा पॉलिसी वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून हडपसरमधील कला परिवाराच्या वतीने खासगी रुग्णालयामध्ये आया व घरकामकरणाऱ्या महिलांना सुरक्षा कवच म्हणून प्रत्येकी एक लाख रुपयांची अपघाती विमा पॉलिसी देण्यात आली.
याप्रसंगी माजी महापौर वैशाली बनकर, नगरसेविका हेमलता मगर, नगरसेविका उज्वला जंगले, जिल्हा परिषद सदस्य वंदना कोद्रे, सुशीला गुंजाळ, स्वाती चिटणीस, स्वाती टिळेकर, हेमा लाळगे, मंदा शेडगे, शीतल शिंदे, स्वाती सातव, शीतल चांदणे, हडपसर पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षिका आर. आर. पाटील, संजय शिंदे, जीवनबाप्पू जाधव, राजकुमार तिखे, ॲड. विजयकुमार काळे, रुपाली शिंदे, सीमा शेंडे उपस्थित होते
यावेळी डॉ. अश्विनी शेंडे, ऋतिका चौधरी, संगीता बोराटे, डॉ. शंतनु जगदाळे, रूपाली वांबुरे, आकाश जाधव, रौफ शेख, अजय खंडागळे, श्रुतिका क्षीरसागर, जयश्री चव्हाण, राजश्री कदम, प्रमोद अय्या, काजल माने, श्रीकृष्ण भिंगारे, प्रशांत नवले यांच्या हस्ते मान्यवरांचा गौरव करण्यात आला. दरम्यान, नगरसेविका हेमलता मगर, उज्ज्वला जंगले, वंदना कोद्रे यांनीही मनोगत व्यक्त केले.
डॉ. अश्विनी शेंडे व श्रुतिका चौधरी यांनी अनोखी संकल्पना राबविली. योगेश गोंधळे, दिलीप मोरे, आकाश जाधव यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. रूपाली वांबुरे यांनी सूत्रसंचालन केले. श्रुतिका चौधरी यांनी आभार मानले.