बहुजननामा ऑनलाईन टीम – Women Heart Problems | काही आजार असे आहेत जे फक्त महिलांना प्रभावित करतात, ज्यामुळे त्यांच्यात कार्डियोव्हॅस्कुलर सारखा आजार वाढण्याची जोखीम वाढते. गरोदरपणात वाढणार्या एंडोमेट्रियोसिस, पॉलीसिस्टिक अंडाशय रोग, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासारखे रोग हृदयविकाराच्या झटक्याची शक्यता (Women Heart Problems) वाढवू शकतात.
याशिवाय महिला पुरुषांप्रमाणे हाय ब्लड प्रेशर, हाय शुगर लेव्हल, हाय कोलेस्ट्रॉल आणि लठ्ठपणासारख्या समस्यांना तोंड देतात. यामुळे त्यांच्यात पुरुषांच्या तुलनेत हृदयविकाराच्या झटक्याचा धोका वाढतो.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
महिलांना होत नाही छातीत वेदना
महिलांमध्ये अनकदा हार्ट अटॅक आल्यास छातीत वेदना होत नाहीत, त्यांच्यात इतर लक्षणे दिसतात. ज्यांना अनेकदा इतर कारण समजल्याने उपचाराला उशीर होतो. 60 च्या वयानंतर ही जोखीम वाढते.
महिलांनी हार्ट अटॅकच्या या लक्षणांकडे करू नये दुर्लक्ष
1. हृदयावर दबाव जाणवणे. वेगळी वेदना जाणवणे, अस्वस्थ वाटणे.
2. हात, पाठ, मान किंवा जबड्यात वेदना होणे.
3. पोटात वेदना होणे, दबाव जाणवणे, छातीत जळजळ.
4. श्वास घेण्यास त्रास, मळमळ, चक्कर येणे, घाम येणे.
5. जास्त कमजोरी जाणवणे.
महिलांनी आपल्या हृदयाच्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. योग्य डाएट, वर्कआऊट, तणाव नियंत्रण, वजन नियंत्रण, तसेय व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे. (Women Heart Problems)
Web Title :- Women Heart Problems | 5 signs of heart diseases women must not ignore know about it