बहुजननामा ऑनलाईन टीम – एका महिला डॉक्टरला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढेच नाही तर यावेळी अश्लील व्हिडिओ ही काढण्यात आले. आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून बदनामी करण्याची धमकी ही महिलेला देण्यात आली. महिलेला नराधामाने लॉजवर नेऊन जबरदस्तीने तिच्यासोबत शरीरसंबंध आणि अनैसर्गिक कृत्य केले.
या प्रकरणी पीडित महिलेने चिखली पोलीस स्टेशनमध्ये रवींद्र लसणे आणि दीपक पाटील या दोन आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पीडित महिलेला माफी मागायचे कारण सांगत लॉजवर बोलावून गुंगीचे औषध देऊन आरोपींनी महिलेवर अत्याचार केला. याचे अश्लील व्हिडियोही बनवले. हा प्रकार २०१० पासून सुरु होता. आरोपींनी तब्बल नऊ वर्षे पीडितेवर अत्याचार केला. दरम्यान रविवारी पुन्हा दोन्ही आरोपी पैसे घेण्यासाठी पीडित महिलेकडे आले असता पुन्हा धमकी देऊन अत्याचार केला. अखेर या अत्याचाराला कंटाळून पीडित महिलेने पोलिसांकडे धाव घेतली.
महिलेने कित्येकदा नकार दिल्यास व्हिडिओ पती आणि सोशल मीडियावर टाकण्याची धमकी आरोपींनी महिलेला दिली. तसेच तिच्यासमवेत पती आणि मुलांना जिवे मारण्याची धमकी देऊन जबरदस्ती शरीरसंबंध आणि अनैसर्गिक कृत्य केले. या दरम्यान एकाच्या मध्यस्थीने हे सर्व प्रकरण मिटवण्यासाठी ४ लाख रुपये घेतल्याचेही पीडितेने पोलिसांना सांगितले.