मुंबई न्यूज (Mumbai News): बहुजननामा ऑनलाइन – एका महिला मानसोपचार तज्ज्ञाने शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दखल घेत या प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्तांनी (Mumbai Police Commissioner) लक्ष घालावे. त्याचबरोबर याचा सद्यस्थितीचा अहवाल २४ जूनपर्यंत सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. दरम्यान, या आदेशामुळे संजय राऊत (Sanjay Raut) याची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
womans petition against sanjay raut in HC, mumbai high court directs mumbai police commissioner look her grievances
एका मानसोपचार तज्ज्ञा(Psychiatrist) ने मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. त्यामध्ये गेल्या सात वर्षांपासून संजय राऊत आपला छळ करत आहेत. माझ्यावर पाळत ठेवण्यासाठी त्यांनी माणसे लावली होती. शिवीगाळ करणं, जीवानिशी मारण्याच्या धमक्या देणं यांसारखे गंभीर आरोप करण्यात आले आहे. या याचिकेत मुंबई पोलिसांनाही प्रतिवादी करण्यात आले आहे. याची गंभीर दखल घेत या प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्तांनी यात लक्ष घालून तक्रारीचे निवारण करावे त्याचबरोबर २४ जूनपर्यंत सद्य स्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानंतर भाजप(BJP) नेते निलेश राणे(Nilesh Rane) यांनी ट्विटरच्या माध्यमातून संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून संबंधित महिला संजय राऊतांच्या जाचाला सामोरी जात आहे. कोणतेही कारण नसताना दोन आठवड्यांपूर्वी या महिलेला पोलिसांनी अटक केली होती. राऊतांनि तिच्या आयुष्याची वाट लावली आहे. हे वृत्त माध्यमं दाखवत नाही त्यामुळे न्यायालयाने दिलेले जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे. अशी विनंतीही राणे यांनी ट्विट द्वारे केली आहे.
web title: womans petition against sanjay raut in hc mumbai high court directs mumbai police commissioner look her grievances
Meteorological Department | शेतकर्यांसह सर्वांची चिंता वाढविणारा हवामान विभागाचा अंदाज
Pimpri News | पहिला विवाह झाला असताना लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार
anil parab | ‘डोंगर’ पोखरुन ‘उंदीर’ही नाही निघाला; परिवहन मंत्री अनिल परब यांना मोठा दिलासा
Antibodies | कोरोना झाल्यानंतर एवढ्या दिवसांपर्यंत शरीरात राहतात अॅन्टीबॉडी, वैज्ञानिकांनी सांगितलं