बहुजननामा ऑनलाईन – ती चोरी करण्याच्या उद्देशाने मॉलमध्ये गेली. तिने चोरीसुद्धा केली. मात्र चोरी करण्याच्या नादात ती तिच्या मुलाला मॉलमध्येच विसरली आणि तिची चोरी उघडकीस आली. ही घटना मॉलच्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, स्टोअर मालकाने हा व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. अमेरिकेतील न्यु जर्सीमधील मिडलटाऊनमध्ये तीन महिला बांबी स्टोअरमध्ये गेल्या. त्यातील दोन महिलांनी स्टोअरमधील कर्मचाऱ्यांचे लक्ष वळविण्याचा प्रयत्न केला.
तर तिसऱ्या महिलेने तेथे ठेवलेला पाळणा चोरला आणि निघून गेली. त्यानतंर त्या दोन महिलाही तेथून निघून गेल्या. मात्र त्यांनी आणलेले बाळ स्टोअरमध्येच राहिले. स्टोअर मालकाला कोणाचे तरी बाळ स्टोअरमध्ये राहिल्याचे कळाले. ते बाळ कोणाचे असावे, हे शोधण्यासाठी त्याने सीसीटिव्ही कॅमेरे चेक केले तेव्हा त्याला चोरी झाल्याचे समजले. ती महिला जेव्हा बाळाला घ्यायला पुन्हा आली. तेव्हा ती पकडली गेली.
स्टोअरच्या मालकाने आता चोरीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे आणि निरपराध मुलांचा वापर चोरीसाठी कधी करु नका, असे आवाहन केले आहे.