बहुजननामा ऑनलाईन टीम : एका सावत्र बापाने आपल्या ११ वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिला कित्येक वर्षे तिला कैद करून ठेवले, त्यानंतर त्याने पीडित मुलीशी लैंगिक संबंध ठेवले. या दरम्यान तिने ८ मुलांना जन्म दिला आहे. आता आपल्या सावत्र बापाच्या कैदेतून सुटल्याच्या ३ वर्षानंतर मुलीने आपली कहाणी सार्वजनिक करण्याचा निर्णय घेतला, आणि अमेरिकन टीव्ही शो डॉ. ओझ शो च्या मुलाखतीत तिने घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला.
मिळालेल्या माहितीनुसार , पीडितेच्या आईला त्रास देण्याच्या उद्देशाने सावत्र बापाने १९९७ मध्ये तिचे अपहरण केले होते. अमेरिकेच्या ओक्लाहोमा येथे राहणाऱ्या मुलीचे अपहरण करून तिला मेक्सिकोमध्ये नेण्यात आले. त्यानंतर त्या सावत्र बापाने मुलीशी जबरदस्तीने लग्न केले, आणि तिच्याशी संबंध निर्माण केला आणि ८ मुलांना जन्म दिला. यावेळी तिला एका टेंटमध्ये ठेवण्यात आले, जेणेकरून अधिकाऱ्यांच्या नजरेतून वाचू शकू.
२०१६ मध्ये ही मुलगी आपल्या मुलांसह अमेरिकन दूतावासात पळून गेली. त्यानंतर काही अनोळखी व्यक्तींनी तिला मदत केली. यादरम्यान सावत्र बापाला अपहरण केल्याबद्दल कोर्टाने दोषी ठरवले आहे. बलात्कार प्रकरणातील कोर्टाचा निर्णय अजून बाकी आहे. दरम्यान, असेच एक प्रकरण ऑस्ट्रियामधूनही समोर आले आहे. जेथे एका व्यक्तीने त्याच्या स्वत: च्या मुलीला बराच काळ कैद करून ठेवले होते. २४ वर्षांच्या कालावधीत तिने ७ मुलांना जन्म दिला होता.
Visit : bahujannama.com