छिंदवाडा : वृत्तसंस्था – देशात कोरोना बाधितांवर रुग्णालयात उपचार केले जात आहे. कोरोनामुक्त झालेल्या लोकांचे त्यांच्या परिवारातील लोक मोठ्या उत्साहात घरात स्वागत करतात. मात्र, मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे धक्कादायक प्रकार घडला आहे. कोरोनामुक्त होऊन घरी परतलेल्या महिलेला तिच्या पती आणि मुलीने मारहाण केली. एवढेच नाही तर तिच्यावर चाकूनं जीवघेणा हल्ला देखील केला आहे. याप्रकरणी महिलेने पती आणि मुलीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
शोभना यांनी पोलिसांना सांगितले की, मी कोरोनातून नुकतीच बरी झाले आहे. 16 ते 17 दिवसानंतर मी घरी गेले होते. त्यावेळी पती आणि मुलीनं उपचारांवर झालेल्या खर्चावरुन वाद घातला. पती आणि मुलीनं माझ्यावर जीवघेणा हल्ला केला. मी तिथून कशीबशी निसटले, असा जबाब शोभना यांनी नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस करित आहेत.
’10 टक्के EWS आरक्षण मोदी सरकारनं दिलं, कर्तव्यशून्य हा आघाडीचा परिचय’
पुणे-सोलापूर रस्त्यावरील प्रसिद्ध हॉटेल कांचनला भीषण आग
कोरोनाच्या तिसर्या लाटेच्या पार्श्वभुमीवर आपल्या मुलांना फ्लूची लस देणं कशामुळं महत्वाचं?
रुसून माहेरी गेलेल्या पत्नीला धडा शिकवण्यासाठी पतीने केले असे काही की…