लखनऊ : वृत्तसंस्था – यूपीची राजधानी लखनऊमध्ये एका माजी आमदाराच्या सुनेवर तिच्यात घरात घुसून एका महिलेने जीवघेणा हल्ला केला. फर्रुखाबादमधून माजी आमदार असलेले विजय सिंह समाजवादी पार्टीचे माजी आमदार आहेत, यावेळी ते ब्रह्मदत्त द्विवेदी हत्याकांडात कारागृहात शिक्षा भोगत आहेत. माजी आमदाराची सून एकताने आरोप केला आहे की, घरात घुसलेली महिला तिच्या पतीची मैत्रिण आहे. तिने एकताला म्हटले, तुझा पती माझा आहे, तुला मरावे लागेल…यानंतर तिने एकतावर हल्ला केला. गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. एकताने आपल्या बहिणीच्या मदतीने जीव वाचवला.
एकताने आरोप केला की, हजरतगंजच्या कसमंडा हाऊस अपार्टमेंटमधील त्यांच्या फ्लॅटमध्ये हल्लेखोर महिला थेट घुसली. ही घटना 29 मे रोजी सकाळी घडली. एकताने या प्रकरणी वीरांगना सिंहच्या विरूद्ध हजरतगंज पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवला आहे. हजरतगंज पोलीस तपास करत आहेत.
कृपया हे देखील वाचा:
मंगलदास बांदल यांच्या अडचणीत वाढ; पुन्हा नवीन गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण
50 हजाराची लाच घेताना उत्पादन शुल्कचा निरीक्षक अॅन्टी करप्शनच्या जाळयात
कोविड व्हॅक्सीन घेतल्यानंतर ‘ही’ 7 कामं अजिबात करू नका, ‘या’ गोष्टींची घ्या काळजी; जाणून घ्या