नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका 28 वर्षीय महिलेने मुलाखतीत सांगितले आहे की, तिने 130 पुरुषांसोबत शारिरीक संबंध ठेवले आहे. परंतु बर्याच लोकांसोबत प्रेमसंबंध असल्यामुळे तिचे शारीरिक तसेच मानसिक नुकसानही झाले आहे. ब्रिटनमधील रहिवासी फ्रॅन्की कोन्सिडिन म्हणाली की, तिचा मेंदू सामान्यत: तेव्हाच कार्य करतो जेव्हा तिला माहित असते की आपण आज कोणाबरोबर झोपणार आहोत. वास्तविक फ्रॅन्की आरोग्याच्या स्थितीशी झगडत आहे. सेक्स एडिक्शन सहसा पुरुषांना जोडताना दिसले तरी स्त्रियासुद्धा याचा बळी असतात. डॉक्टरांनी सेक्स एडिक्शनला मानसिक मेंटल हेल्थ डिस्ऑर्डर म्हणून मान्यता दिली आहे.
फ्रॅन्की देखील सेक्स एडिक्शनशी झगडत आहे. टायगर वुड्स, रसेल ब्रँड सारखे सेलिब्रिटीं देखील सेक्स एडिक्शला वैतागले आहे. ब्रिटनमध्ये अंदाजे 6 लाख 60 हजार महिला सेक्स एडिक्शनचा सामना करत आहे. सेक्स एडिक्शन ग्रस्त लोकांमध्ये इतरही अनेक समस्या असू शकतात. फ्रॅन्की देखील यामुळे डिप्रेशन आणि अनेक एसआयटीची बळी ठरली आहे, ब्रिटनच्या रॉयल कॉलेज ऑफ सायकायट्रिस्टच्या म्हणण्यानुसार देशातील 4 टक्के लोक सेक्स एडिक्ट आहेत.
त्यापैकी एक चतुर्थांश महिला आहेत. कोणत्या कारणास्तव सेक्स एडिक्शन होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याचबरोबर, फ्रॅन्कीचे असे म्हणणे आहे की, तिच्या पालकांचा घटस्फोट देखील त्यामागील कारण असू शकते. कारण फ्रॅन्की 13 वर्षांची असताना पालकांनी घटस्फोट घेतला. मग कर्करोगाने आईचेही निधन झाले.