पिंपरी- चिंचवड : बहुजननामा – पिंपरीतील रावेत येथे पतीने पत्नीच्या डोक्यात हातोडा घालून तिची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पत्नीच्या हत्येनंतर नंतर पतीनेही गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आल्याने परिसरात गोंधळ उडाला आहे. वृषाली गणेश लाटे आणि गणेश ऊर्फ संजू चंद्रकांत लाटे (रा. आदित्य टेरेस, शिंदे वस्ती, रावेत) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे.
वरिष्ठ निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार,तपासा दरम्यान गणेश यांनी सुसाईट नोटमध्ये लिहिल्याप्रमाणे ‘वृषाली आजारी असल्याने तिला त्या यातना सहन होत नव्हत्या म्हणून त्याने वृषालीची निर्घृण हत्या करत, स्वतः गळफास लावून आत्महत्या केली आहे’.
दरम्यान, कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. बुधवारी पहाटे चारच्या सुमारास गणेश यांनी आपल्या पत्नीचा हातोडी डोक्यात घालून निर्घृण हत्या केली. त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत अधिक तपास देहूरोड पोलीस करीत आहेत.