कल्याण : बहुजननामा ऑनलाईन – पत्नी अभावी चिमुकलीचे (daughter) पालनपोषण कसे करणार, या चिंतेने ग्रासलेल्या बापाने दोन महिने २३ दिवसांच्या चमुकलीला (daughter) सोडून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला. हि घटना सोमवारी कल्याणमध्ये घडली. दरम्यान पळून जाण्याचा नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्याचा प्रयत्न फसला असून त्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. खलील शेख (रा. कळवा) असे त्याचे नाव आहे. दरम्यान पावणेतीन महिन्यांच्या मुलीला डोंबिवलीतील जननी आशिष या संस्थेत ठेवण्यात आले आहे.
कल्याण रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या गुरूदेव हॉटेल येथील स्कायवॉकच्या खाली खलील शेख चिमुकलीला घेऊन उभा होता. काही वेळानंतर तो तिला तिथेच सोडून जात असल्याचे काही तरुणींनी पहिले असता त्यांनी त्याच्याकडे विचारणा केली. तो घाबरला. तरुणींनी आरडाओरड करून आजुबाजूच्या नागरिकांना सतर्क करत त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
पत्नीअभावी मुलीचा सांभाळ कसा करायचा, याची चिंता त्याला असावी आणि त्या चिंते पोटीच त्याने चिमुकलीला सोडून पलायन करण्याचा प्रयत्न केला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.