साताराः बहुजननामा ऑनलाइन- satara | एका गटशिक्षणाधिकाऱ्याने एका विधवा शिक्षिकेचा (Widow teacher) एकाकीपणाचा फायदा घेत मानसिक अन् शारीरिक छळ (Sexual harassment) करत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी (Demand sexual relation) केल्याची धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यातून (Satara district) समोर आली आहे. याप्रकरणी पीडितेने या त्रासातून सुटका व्हावी याकरिता गटशिक्षणाधिका-याच्या दुष्कृत्याची तक्रार आयुक्तांकडे केली आहे. या संतापजनक घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला जात असून आरोपी शिक्षणाधिका-यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान या प्रकरणाची विशाखा समितीमार्फत चौकशी सुरू केली आहे.
आरोपी गटशिक्षणाधिकारी(Group Education Officer) हा सातारा पंचायत समिती(Satara Panchayat Samiti)त कार्यरत आहे. तर पिडित शिक्षिका सातारा तालुक्यातील एका शाळेत उपशिक्षिका पदावर कार्यरत आहे.
प्राप्त माहितीनुसार, पीडित महिला शिक्षिकेने आयुक्तांना दिलेल्या निवेदनात आरोपी गटशिक्षणाधिका-यावर गंभीर आरोप केले आहेत. शाळेत रुजू झाल्यापासून आरोपीने त्रास द्यायला सुरु केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच गटशिक्षणाधिकाऱ्याने पंचायत समितीत बोलावून कौटुंबीक पार्श्वभूमी जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
31 जानेवारी 2020 रोजी मुख्याध्यापक कामानिमित्त बाहेर गेले असताना दुपारी आरोपीने अचानक शाळेला भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांची चौकशी करायची सोडून पीडितेवर अश्लील शेरेबाजी केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. आरोपी गटशिक्षणाधिकारी 10 अन् 17 जून 2020 रोजी दोन वेळा पीडीतेच्या घरी जाऊन शरीरसुखाची मागणी केली आहे. कोरोना काळात वर्गातील मुलांची तपासणी घेवून शैक्षणिक कामाबाबत नाचक्की करण्याचा देखील प्रयत्न केला. तसेच पीडितेबाबत शिक्षणाधिकार्यांकडे तक्रार अर्जही केल्याचे निवेदनात म्हटले आहे.
web title: widow teacher harassed by education officer in satara demand sexual relation