नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशातील कोविड-19 च्या स्थितीचा आढावा घेतला. केंद्रीय पथकाला दुसर्या लाटेने सर्वाधिक प्रभावित महाराष्ट्र, पंजाब आणि छत्तीसगढचा दौरा करून आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश दिले गेले आहेत. सरकारी सूत्रांनुसार केंद्रीय पथकात आरोग्य तज्ज्ञ आणि डॉक्टरांचा सुद्धा समावेश असेल. पीएम मोदी यांनी बोलावलेल्या या हाय-प्रोफाइल बैठकीत कोविडपासून बचाव होण्यासाठी प्रत्येक पद्धत अवलंबण्यावर जोर देण्यासाठी 6 ते 14 एप्रिलदरम्यान एक विशेष जागरूकता अभियान राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामध्ये 100 टक्के लोकांनी मास्क घालण्यावर जोर, व्यक्तीगत स्वच्छता आणि सार्वजनिक स्थळे आणि कामाच्या ठिकाणी साफ-सफाई आणि आरोग्य सेवांवर फोकस करण्याचा निर्णय घेण्यात आला. दुसर्या लाटेत सर्वात जास्त संसर्ग समोर आल्यानंतर ही बैठक झाली आहे. हा आकडा मागील वर्षीच्या ऑक्टोबर नंतरचा सर्वात जास्त म्हणजे 98,000 च्या जवळ पोहचला आहे.
दुसर्या लाटेत वेगाने पसरत आहे कोरोना
कोरोना संसर्गामुळे देशातील अनेक राज्यात अशी स्थिती झाली आहे की, त्यांनी प्रतिबंध लावण्यास सुरूवात केली आहे. महाराष्ट्रात नाईट कर्फ्यू लावणे, थिएटर, रेस्टॉरंट आणि पार्क बंद करण्यासारखी पावले उचलण्यात आली आहेत. येत्या काही दिवसात आणखी काही प्रतिबंध लावण्याची घोषणा केली जाऊ शकते. अशाच प्रकारे मध्य प्रदेशाने सुद्धा अनेक राज्यांतून येणार्या लोकांसाठी सक्तीची घोषणा केली आहे. यापूर्वी दिल्लीत पीएमने जी हाय-प्रोफाईल बैठक घेतली त्यामध्ये 5 मुद्द्यांच्या रणनितीवर फोकस करण्यात आला. ती आहे – टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रीटमेंट, कोविडपासून वाचण्यासाठी अनुकूल वर्तन आणि व्हॅक्सीनेशन. बैठकीत लोक या निष्कर्षावर पोहचले की, जर या सर्व गोष्टी व्यवस्थित लागू केल्या गेल्या तर कोरोनापासून वाचण्याचा सर्वात प्रभावी उपाय ठरू शकतो.
कोरोना व्हायरस अनियंत्रित होण्याची 3 कारणे
भारत दररोजच्या संसर्गाच्या प्रकरणांमध्ये जगात सर्वांच्या पुढे गेला आहे. हा वेग पाहून वाटते की, कोणत्याही दिवशी पहिल्या लाटेचा सुद्धा आकडा पार केला जाऊ शकतो. पीएम मोदी यांच्यासोबत जी हाय-प्रोफाईल बैठक झाली आहे, त्यामध्ये दुसर्या लाटेच्या अनियंत्रित वेगाची प्रामुख्याने 3 कारणे सांगितली गेली आहेत – कोविड-19 पासून बचावासाठी करण्यात येणार्या योग्य वर्तनात आलेली कमतरता, महामारीने थकणे आणि प्रतिबंधात्मक उपायांमध्ये आलेली कमतरता. या बैठकीत पंतप्रधानांचे प्रिंसिपल सेक्रेटरी, कॅबिनेट सेक्रेटरी, होम सेक्रेटरी, एम्पॉवर्ड ग्रुप ऑन व्हॅक्सीन अॅडमिनिस्ट्रेशनचे चेयरपर्सन, हेल्थ सेक्रेटरी आणि आयसीएमआरचे डायरेक्टर जनरल यांच्यासह अन्य लोक सुद्धा सहभागी झाले होते.