बहुजननामा ऑनलाईन – जर आपल्याला वारंवार हाता पायामध्ये मुंग्या येणे, स्नायू दुखणे अशी समस्या दिसून येत असेल तर ही कॅल्शियमची कमतरतेची लक्षणे आहेत….
वयाच्या ३० वर्षानंतर कॅल्शियमची कमतरता का उद्भवते?
वयाच्या तिशीनंतर महिलांसाठी कॅल्शिअम खूप महत्त्वाचे असते. वाढत्या वयानुसार महिलांची हाडे ठिसूळ व कमकुवत होऊ लागतात. यामुळे मासिकपाळी मध्ये जास्त रक्त वाहणे, स्तनपान देताना किंवा गर्भधारणेदरम्यान महिलांच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता दिसून येते.
किती प्रमाणात कॅल्शियम घेणे आवश्यक आहे
प्रत्येक दिवसाला ४ ते १८ वयोगटातील महिलांसाठी दररोज १३०० एमजी, प्रौढ महिलांसाठी १००० तसेच ५० ते ७० वयातील महिलांसाठी १२०० मिलीग्राम कॅल्शियम घेणे खूप महत्वाचे आहे. २०१५ च्या संशोधनानुसार, जगभरातील सुमारे ३.५ अब्ज लोक कॅल्शियम आहार न घेतल्यामुळे कॅल्शियमच्या कमतरतेने ग्रस्त आहेत. पुरुषांपेक्षा महिलांमध्ये कॅल्शियमची कमतरता असल्याचे दिसून आले आहे.
कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणे….
१) जेव्हा कॅल्शियमची कमतरता जाणवते तेव्हा हाता पायामध्ये मुंग्या येतात तसेच शरीरात थकवा जाणवतो.
२) आपल्याला कमी प्रमाणात भूक आणि झोपही लागत नाही.
३) स्नायूंमध्ये सूज व वेदना जाणवते.
४) दात खराब होण्यास सुरुवात होते तसेच नखांवर पांढरे ठिपके दिसून येतात.
कॅल्शियमची कमतरता कशी पूर्ण करावी जाणून घ्या..
कॅल्शियमसाठी दूध, पनीर, दही यासारख्या दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करणे खूप महत्वाचे आहे. यासोबत आपण अंड्यातील पांढरा भाग, सीफूड, पालेभाज्या, डाळी, ड्रायफ्रूट्स, ब्रोकोली, पालक, सोयाबीन, सोया दूध इ. सकाळी सुर्यप्रकाशात जावे यामुळे आपल्याला विटामिन डी मिळते.