ओटावा : वृत्तसंस्था – अॅडल्ट वेबसाइट पॉर्नहबच्या विरूद्ध एकाच वेळी 40 महिलांनी केस दाखल केली आहे. महिलांचा आरोप आहे की, या साइटने सेक्स ट्रॅफिक (Sex Trafficking) ऑपरेशनद्वारे नफा कमावला आहे. त्यांच्या संमतशिवाय पर्सनल फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड केले. काही दिवसांपूर्वी या साइटवर चाइल्ड सेक्स अब्यूज आणि रेपचे व्हिडिओ अपलोड केल्याचा आरोप करण्यात आला होता. याची चौकशी सुरू आहे.
रिपोर्टनुसार, पॉर्नहबची पॅरंट कंपनी माईंडगीक (Mindgeek) वर 40 महिलांनी 40 मिलियन डॉलरचा खटला दाखल केला आहे. या महिलांनी आरोप केला आहे की, त्या पॉर्नहबची भागीदार कंपनी ’गर्ल्स डू पॉर्न’ (Girls Do Porn) ला बळी पडल्या आहेत. तसेच पॉर्नहब अनेक वर्षांपर्यंत गर्ल्स डू पॉर्नसोबत उद्योग करत होती. कंपनीला या गोष्टीची माहिती होती की, गर्ल्स डू पॉर्न बेकायदेशीर हालचालीत सहभागी आहे.
याशिवाय पॉर्नहबवर आरोप आहे की, त्यांनी सेक्स ट्रॅफिकिंगने पीडित महिलांच्या याचिकांकडे दुर्लक्ष केले. या महिलांनी कंपनीला व्हिडिओ हटवण्याची मागणी केली होती. विशेष गोष्ट म्हणजे गर्ल्स डू पॉर्न 2019 मध्ये बंद करण्यात आली होती. त्यावेळी एफबीआयने पीडित महिलांची चुकीच्या पद्धतीने सहमती मिळवण्याच्या आरोपत तपास सुरू केला होता.
काय आहे खटला
आपल्या तक्रारीत 40 पीडितांनी आरोप केला होता की, पॉर्नहबची पॅरंट कंपनी माईंडगीकला 2009 पासूनच गर्ल्स डू पॉर्नच्या बेकायदेशीर कामांची माहिती होती. 2016 येता-येता अनेक पीडितांनी पुढे येऊन चुकीच्या पद्धतीने सहमती मिळवणे किंवा फसवणूक करून अश्लील व्हिडिओ शूट करण्याचा आरोप केला होता.
यानंतर अनेक वर्षांपर्यंत पॉर्नहबने याबाबत काहीही केले नाही. आणि पीडितांचा आरोप असतानाही कंटेट आपल्या वेबसाइटवर स्ट्रीम करू दिला. अनेक महिलांनी सांगितले की, कशाप्रकारे मीडियाशी बोलल्यानंतर सुद्धा पॉर्नहबने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. खटल्यात म्हटले आहे की, भागीदार कंपनीच्या विरूद्ध सेक्स ट्रॅफिकिंगच्या वाढत्या पुराव्यानंतर सुद्धा माईंडगीकने पीडितांची मदत करणे किंवा तक्रारीची चौकशी करण्यास नकार दिला.
एफबीआयने मागील वर्षी ऑगस्टमध्ये गर्ल्स डू पॉर्नची चौकशी सुरू केली होती. यानंतर पॉर्नहबने ऑक्टोबरमध्ये आपल्या पेजवरून कंटेट पेजवर जारी ठेवणे सुरू केले होते.