बहुजननामा ऑनलाईन टीम : जगभरात कोरोनाने थैमान घातले असून प्रत्येक देश वेगाने संशोधनात गुंतला आहे. मात्रा, विषाणूला नष्ट करण्यासाठी अद्याप कोणत्याही स्वरुपाचे यश मिळू शकलेले नाही. सध्या कोरोनावरील महत्वाच्या 8 लसींची वैद्यकीय चाचणी घेतली जात आहे. तर इतर 110 लस संपूर्ण जगभरात विकसीत होण्याच्या विविध टप्प्यातून जात आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) ही माहिती दिली आहे.
जगातील सर्व देश एकजूट होऊन कोरोनाचा फैलाव संपवण्याची तयारी करीत आहेत. त्यामध्ये अमेरिका, चीन आणि जर्मनी मोहिमेचे नेतृत्व करीत आहेत. सध्याच्या परिस्थितीत अमेरिका आणि चीनसहित इतर अनेक देशांनी लस तयार करण्याच्या तारखाही जाहीर केल्या आहेत. शनिवारी चीनचे आरोग्य अधिकारी झांग वेनहोंग यांनी म्हटले की, 2021 च्या मार्चमध्ये कोरोना विषाणू संपवण्यासाठी लस तयार झालेली असेल. लस तयार करण्यात सध्या मोठी अनिश्चितता आहे.
विषाणूला संपवण्यासाठी आजवर कोणतीही चांगली लस निर्माण होऊ शकलेली नाही. उलट एखादी लस यासाठी प्रभावी ठरु शकली तरी ती तयार होण्याची शक्यता पुढील वर्षी मार्च ते जून दरम्यानच असणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, या वर्षाच्या शेवटापर्यंत आपल्याला लस मिळेल. याचबरोबर जगातील इतरही अनेक देशांच्यावतीनं देखील हाच दावा केला जात आहे की लवकरच लस शोधली जाईल. असा दावा केला आहे.