मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र (धुळे ,यवतमाळ)दौऱ्यावर येत आहेत. तसेच दुसरीकडे मोदी गो बॅक अश्या प्रकारची पोस्टरबाजी पांढरकवढा येथे दिसली आहे. त्यामुळे हा दौरा रद्द होतोय कि काय अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (दुपारी १ वाजता) नियोजित कार्यक्रमानुसार धुळ्यात येणार असून, नंतर यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदी पांढरकवडा येथे बचतगटाच्या कार्यक्रमासाठी जाणार आहे. या ठिकाणी महिला बचतगटाचे अतिशय मोठे जाळे आहे. या सर्व महिलांचे कौतुक करण्यासाठी पंतप्रधान पांढरकवडा येथे येणार आहेत.
नरेंद्र मोदींच्या दौऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, एकीकडे पुलवामा घटनेमुळे संपूर्ण देश दुःखात आहे. शहीद जवानांचे पार्थिव अद्याप त्यांच्या घरीही पोहोचलेले नाही. जनतेच्या भावना संतप्त आहेत आणि या देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री यांनी जाहीर कार्यक्रमांचा, उदघाटनांचा सपाटा लावलाय. इतक्या यांच्या संवेदना कशा बोथट झाल्या आहेत? असा प्रश्न मुंडे यांनी उपस्थित केला आहे.