मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – CAA आणि NRC कायद्याला देशभरातून विरोध होत असताना आता समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदीं आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर सडकून टीका केली आहे. इतरांची जन्मप्रमाणपत्र मागवण्याआधी मोदी यांनी आपल्या आईच्या जन्माचा दाखला आणावा असे संतापजनक वक्तव्य आझमी यांनी केले आहे. मुंब्य्रातील शाहीन बाग येथील जनआंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी हे विधान केलं आहे. यापूर्वी देखील त्यांची वक्तव्य वादग्रस्त ठरली होती.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, जे पद सरदार पटेलांनी भूषविले होते त्याच पदावर अमित शहांसारखी व्यक्ती बसली आहे, हे देशाचे दुर्दैव असल्याची टीका त्यांनी केली. इतरांची जन्मप्रमाणपत्र मागविण्याआधी मोदी यांनी आपल्या आईच्या जन्माचा दाखला आणावा, असे संतापजनक वक्तव्य केले आहे. जमावाला चिथविण्यासाठी केलेली विधानं वैयक्तिक पातळीवर केली जात असल्याचे बोलले जात आहे. शहा हे तुरुंगवास भोगून आले असल्याने त्यांनी या पदावर बसने हे अपमानजनक असल्याचं आजमी म्हणाले.
तसेच जेव्हा मुस्लिम समाज देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत होता, तेव्हा मोदी – शहांची माणसं इंग्रजांशी संधान बांधून आपल्याच देशबांधवांच्या विरोधात कारवाया करत होते असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. सरदार वल्लभभाई पटेल हे स्वातंत्र्यानंतरचे भारताचे पहिले गृहमंत्री असून त्यांनी राजकीय एकसंघीकरणात मोठे योगदान दिलं आहे. त्यांच्या जागेवर अमित शहा यांची नेमणूक करणे दुर्भाग्यपूर्ण असल्याची जहरी टीका अबू आजमी यांनी शहांवर केली. मुंब्रा येथे जनतेला संबोधित करताना सर्व गुजराती समाजाला त्यांनी इंग्रजांचे दलाल म्हणून संबोधले.
Visit : bahujannama.com