नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगात व्हॉट्सअॅपचे अनेक वापरकर्ते आहेत. तर व्हॉट्सअॅप देखील अनेक वेळा वारंवार अनेक नवनवे फीचर वापरकर्त्यांना देत असतं. तात्काळ मेसेज करण्यासाठी या व्हॉट्सअॅपचा अधिक वापर लोक करतात. तर मागील काही आठवड्यापासून WhatsApp नव्या धोरणामुळे अधिक चर्चेचा विषय बनले आहे. अनेक वापरकर्त्यानी या WhatsApp च्या धोरणाला विरोध दर्शवला आहे. तसेच नव्या मेसेगिंग अॅपचा वापर करण्यासही प्रारंभ केलाय. तर WhatsApp च्या चाहत्यासाठी अतिशय महत्वपूर्ण बातमी पुढं आलीय. ते जाणून घ्या.
WhatsApp च्या नव्या माहितीनुसार, १५ मे च्या अगोदर नव्या गोपनीयता धोरणाचा (Privacy Policy) स्वीकार करावा लागणार आहे. नाहीतर WhatsApp वापरण्यास अडथळा निर्माण होऊ शकणार आहे. तसेच WhatsApp अकाउंट बंद देखील होऊ शकतं. २०२१ च्या जानेवारी महिन्यात कंपनीने आपल्या गोपनीयता धोरणामध्ये काही बदल करण्यात आले होते. या नव्या धोरणानांतर्गत वापरकर्त्यांसाठी नव्या नियमावली आणि अटी आउट केले होते. परंतु, लोकांमध्ये मोठा गोंधळ झाला होता. या दरम्यान, कंपनीच्या माहितीनुसार WhatsApp च्या वापरकर्त्याला कंपनीच्या या धोरणाचा स्वीकार करावा लागणार आहे. कारण ही पॉलिसी अर्थात धोरण नाकारण्याचा कोणताही पर्याय उपलब्ध नाही. WhatsApp ची नवी गोपनीयता धोरण ८ फेब्रुवारीला लागू करण्यात येणार होती. मात्र ही तारीख मुदत वाढवून १५ मे पर्यंत केलीय.
कंपनीच्या माहितीनुसार, १५ मे ला WhatsApp ची नवी पॉलिसी अर्थात लागू केले जाणार आहे. जर एखाद्या व्यक्तीने WhatsApp च्या गोपनीयता धोरणाचा स्वीकार केला नाही, तर वापरकर्ते १५ मे च्या नंतर WhatsApp वर कोणताही मेसेज पाठवू शकणार नाही किंवा मेसेज येणार देखील नाहीत. तर १५ मे अगोदर वापरकर्ते Android आणि IPhone मधून आपली चॅट हिस्ट्री डाउनलोड करू शकतात. परंतु, १२० दिवसांनंतर निष्क्रिय अकाउंट्सची चॅट हिस्ट्री मेसेज, कॉल्स, फोटो, व्हिडीओ सर्व डिलीट होईल. WhatsApp च्या नव्या गोपनीयता धोरणाबाबत संपूर्ण देशात विरोध केला आहे. भारतात WhatsApp चे अधिक वापरकर्ते आहेत. या नव्या नियमामुळे वापरकर्त्यानी नाराजी व्यक्त केलीय. तर म्हणून व्हॉट्सअॅपची नवी पॉलिसी नियमानुसार सर्व वापरकर्त्यांना स्वीकारावी करावी लागणार आहे.
एका हिंदी वेबसाईटच्या माहितीनुसार, वापरकर्त्याला आपली खासगी माहिती, चॅट शेअर होण्याच्या भीतीने अनेकांनी WhatsApp ला इतर पर्याय शोधले आहेत. परंतु, WhatsApp ने याचं खंडन करतं, गुप्त मेसेज चॅट शेअर होणार नसल्याचा खुलासा केलाय. WhatsApp मध्ये आता लवकरच स्टेट्स प्रमाणे पाठवण्यात आलेले मेसेज २४ तासांमध्ये आपोआप जाणार आहेत. आता पाठवण्यात आलेले मेसेज ७ दिवसांनंतर आपोआप गायब होतात. परंतु, आता कंपनीकडून यामध्ये बदल करण्यात जयेणार आहे. तसेच, WhatsApp च्या iOS व्हर्जनमध्ये नवीन फीचरची चाचणी केली जात आहे. या फीचर द्वारे पाठवण्यात आलेले मेसेज WhatsApp वर २४ तासांच्या आत गायब होणार आहेत. अशी माहिती WABetaInfo दिली आहे. दरम्यान, आता फीचरबाबत टेस्टिंग सुरु आहे. तर वापरकर्ता हे ठरवू शकणार आहे ते म्हणजे या नव्या फीचरला इनेबल (Enable) करायचे किंवा नाही.