नवी दिल्ली : वृत्तसंस्था – व्हॉट्सअॅप आपल्या प्रायव्हसी पॉलिसीवरून मागील काही दिवसांपासून खूप चर्चेत होते. यावरून मोठा वाद सुद्धा झाला, ज्यानंतर कंपनीने हे मे महिन्यापर्यंत टाळले होते. परंतु आता कंपनी पुन्हा एकदा प्रायव्हसी पॉलिसी नव्याने लागू करण्याच्या तयारीत आहे. व्हॉट्सअॅप लवकरच एक नवीन अपडेट यूजर्सला पाठवेल, जी एक्सेप्ट केल्यानंतर पुढे अॅप यूज करता येईल.
नव्याने लागू होईल प्रायव्हसी पॉलिसी
व्हॉट्सअॅपने यापूर्वी सुद्धा अपडेटचा अलर्ट संपूर्ण फोन स्क्रीनवर दिला होता आणि यूजर्सला नवीन पॉलिसी एक्सेप्ट न केल्यास अकाऊंट बंद करण्याबाबत सांगितले होते. यावरून भारतासह अनेक देशांतून विरोध केला गेला. वाढता विरोध पाहून कंपनीने ही प्रायव्हसी पॉलिसी पुढे ढकलली होती, परंतु पुन्हा एकदा नव्याने ती लागू करण्याची बाब समोर येत आहे.
अपडेट एक्सेप्ट केल्याशिवाय वापरता येणार नाही
व्हॉट्सअॅपने आपल्या नव्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे की, ते आपल्या प्लॅटफॉर्मवर चॅटद्वारे शॉपिंग करणे किंवा व्यवसायिकांशी संपर्काची नवीन पद्ध डेव्हलप करत आहेत. सध्या अशा चॅट्सचे सिलेक्शन ऑपशन असेल, परंतु येत्या काळात चॅट्सच्यावर हे अपडेट रिव्ह्यू करण्याचा बॅनर दिसेल. यानंतर यूजर्सला अॅप यूज करत राहण्यासाठी अपडेट एक्सेप्ट करावे लागेल. मात्र, कंपनीकडून प्रायव्हेट चॅटला एंड-टू-एंड एनक्रिप्शनने सुरक्षित ठेवण्याचा दावा केला आहे.
दररोज जोडले जात आहेत एक मिलियन लोक
फेसबुकच्या मालकीची कंपनी व्हॉट्सअपनुसार ते बिझनेस चॅट आणि शॉपिंग सर्व्हिस देत आहेत. कंपनीचा दावा आहे की, दररोज एक मिलियनपेक्षा जास्त लोक बिझनेस व्हॉट्सअॅप चॅटशी जोडले जात आहेत. या सर्व्हिसला कस्टमर सर्व्हिस मानून कंपनी व्यवसायिकांकडून शुल्क घेते.