नवी दिल्ली : वृत्तसंस्था – व्हॉट्सअप यूजर्सला लवकरच मोठा दिलासा मिळणार आहे. व्हॉट्सअप एक नवीन फिचरवर काम करत आहे. हे फिचर रोलआऊट झाल्यानंतर यूजर आपली चॅट हिस्ट्री शिप्ट करू शकतील. सोबतच यूजर एका मोबाइल नंबरवरून दुसर्या मोबाइल नंबरवर आपले व्हॉट्सअप अकाऊंट शिफ्ट करू शकतील. सोबतच यूजर आयएसओ प्लॅटफॉर्मवरून अँड्रॉईडवर सुद्धा आपल्या अकाऊंटची चॅट हिस्ट्री शिफ्ट करू शकतील. यामुळे यूजर्सला अँड्रॉईड ते आयएसओ किंवा आयएसओ ते अँड्रॉईड स्मार्टफोनवर शिफ्ट होणे सोपे जाईल. सोबतच वेगवेगळ्या मोबाइल नंबरवर एकच अकाऊंट चालवण्याची सुविधा असेल.
याद्वारे यूजर्स आपला मोबाईल नंबर चेंज करू शकतील. आतापर्यंत ज्या नंबरवर तुमचे व्हॉट्सअप अकाऊंट रजिस्टर्ड आहे, त्याच्यावरूनच व्हॉट्सअप चालवण्याची सुविधा होती. या कारणामुळे यूजर्सला अनेकदा व्हॉट्सअपवाल्या मोबाइल नंबरवर विनाकारण अॅक्टिव्ह रहावे लागत होते. चॅट हिस्ट्री ट्रान्सफर करण्याचा रिपोर्ट सर्वप्रथम व्हॉट्सअप फिचर ट्रॅकर वेबसाइट वेबबेटाइन्फोने दिला होता.
कसे काम करेल नवीन फिचर
व्हॉट्सअपच्या नवीन फिचरवर काम सुरू आहे. वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, नवीन फिचर रोलआऊटच्या नंतर यूजरला व्हॉट्सअपच्या सेटींग्ज मेन्यूमधून चॅट हिस्ट्रीला मायग्रेट करण्याचे ऑपशन मिळेल. यासाठी यूजरला सर्वप्रथम आपले व्हॉट्सअप अकाऊंट प्ले स्टोअरवरून अपडेट करावे लागेल. याची प्रोसेस खुप सोपी आहे. चॅट हिस्ट्री सिंगल टॅपमध्ये ट्रान्सफर करता येऊ शकते. यासाठी केवळ स्टार्ट बटनवर क्लिक करावे लागेल, यानंतर चॅट हिस्ट्री डिलीट करण्याचे ऑपशन ऑटोमेटिक सुरू होईल. नव्या अपडेटनंतर चॅटसह मीडिया फाईलसुद्धा स्थलांतरीत केल्या जाऊ शकतात. व्हॉट्सअपकडून मल्टी-डिव्हाईस फिचरवर काम केले जात आहे, जे वेगवेगळ्या डिव्हाईसवर तुम्हाला एकच अकाऊंट चालवण्याची सूट देईल.