बहुजननामा ऑनलाईन टीम – प्ले स्टोअरवर व्हॉट्सअॅपचे एक नवीन अपडेट मिळाले आहे, ज्याला इंस्टॉल केल्यानंतर काही वापरकर्त्यांच्या फोनमध्ये समस्या निर्माण होत आहेत. व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांनी WABetaInfo ला सांगितल्याप्रमाणे व्हॉट्सअॅपच्या अपडेटनंतर फोनची बॅटरी वेगाने कमी होत आहे. WABetaInfo ने म्हटले आहे की iOS २.१९.११२ अद्यतनित केल्यावर ही समस्या उघडकीस आली आहे. IOS वापरकर्त्यांनी बरेच स्क्रीनशॉट्स शेअर केले आहेत, ज्यामध्ये या व्हॉट्सअॅपमुळे फोनची बॅटरी जलदगतीने संपत आहे.
दरम्यान, असे काही अँड्रॉइड वापरकर्ते देखील आहेत, ज्यांना अशा प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागला आहे. एका वापरकर्त्याने सांगितले की, त्याच्या फोनची बॅटरी सुमारे १५ मिनिटांत २३ टक्के युज होत आहे आणि हे पुन्हा पुन्हा होत आहे.
वापरकर्त्याचे म्हणणे आहे की, थोड्या थोड्या वेळानंतर नोटिफिकेशन येत आहेत. हेच कारण आहे की, काही वेळा फोन पूर्ण चार्ज अजूनही थोड्याच फोनची बॅटरी खूप कमी होते.
व्हॉट्सअॅपमध्ये आले नेटफ्लिक्सचे हे नावर फिचर :
व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांचा अनुभव सुधारण्यासाठी नुकतेच एक नवीन वैशिष्ट्य आणले आहे, जे नेटफ्लिक्सशी जोडलेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता युजर्स व्हॉट्सअॅपवर नेटफ्लिक्स शोचे ट्रेलर पाहण्यास सक्षम असतील.
म्हणजेच नेटफ्लिक्सवर येणारा शोचा ट्रेलर पाहण्यासाठी वापरकर्त्याला नेटफ्लिक्स अॅप उघडावे लागणार नाही. असे म्हटले जाते की जर वापरकर्त्याने नेटफ्लिक्सशी कैम्पैटिबल लिंक शेयर केली तर व्हॉट्सअॅपवर प्ले आयकॉनसह एक मोठा थंबनेल दिसून येईल. प्ले आयकॉनवर टॅप केल्यानंतर, व्हिडिओ व्हॉट्स अॅप चॅटमध्येच पिक्चर-इन-पिक्चर (पीआयपी) मोडमध्ये प्ले होईल.