नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात WhatsApp चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यावरून कंपनीकडूनही आपल्या Users साठी नवनवे फीचर्स आणले जात आहेत. त्यानंतर आता WhatsApp मध्ये Instagram Reels चे शॉर्ट व्हिडिओ लवकरच दिसणार आहेत. सध्या या फीचर्सचे टेस्टिंग सुरू असून, हे फीचर्स लवकरच सर्वांना मिळणार आहे.
WhatsApp मध्ये एक खास टॅब असायला हवे. ज्याच्या माध्यमातून यूजर्संना Instagram Reels व्हिडिओ पाहता येऊ शकतील. यात Reels बनवण्याची सुविधा दिली जाण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत याच्या फीचर्सबाबत माहिती मिळवता येणार आहे. त्यानुसार आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये इंटिग्रेशन प्रोसेसवर विशेष लक्ष दिले जात आहे. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, Instagram आणि WhatsApp चे फीचर्सचे इंटिग्रेशन असायला हवे, यासाठी फेसबुककडून प्रयत्न सुरू आहेत. सध्या या फीचर्सचे टेस्टिंग सुरू आहे. मात्र, येत्या काही दिवसांत या फीचर्सबाबत माहिती मिळवता येऊ शकते. ज्यामध्ये मल्टी डिव्हास सपोर्ट, कॉम्प्युटर आणि लॅपटॉपवर व्हाइस आणि व्हिडिओ कॉलिंग सुविधा या मुख्य असणार आहेत.
Instagram Reels चांगलेच प्रसिद्ध
Instagram Reels व्हिडिओ हे चांगलेच प्रसिद्ध आहेत. याचा यूजरवर्गही मोठा आहे. या Reels व्हिडिओच्या माध्यमातून मनोरंजक शॉर्ट व्हिडिओ दिले जातात. त्यामध्ये वेगळीच धम्माल पाहिला मिळते. आता हेच व्हिडिओ तुम्हाला लवकरच WhatsApp वरही पाहता येणार आहे.