नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आता WhatsApp वर केलेल्या काही चुकांमुळे तुमचे अकाऊंट बॅन होऊ शकते. सोबतच तुम्हाला जेलमध्ये सुद्धा जावे लागू शकते. यासाठी व्हॉट्सअप वापरताना काळजी घेतली पाहिजे. नुकतेच व्हॉट्सअपने (WhatsApp) 20 लाख भारतीय अकाऊंट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ही अकाऊंट तात्पुरती आणि कायमसाठी अशा दोन प्रकारे बंद केली जाऊ शकतात. अकाऊंट बंद होण्याचे काय कारण असू शकते जाणून घेवूयात…
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
स्पॅम मेसेज (Spam messages)
स्पॅम मेसेज पाठवणार्यांवर व्हॉट्सअप कठोर अॅक्शन घेते. दिवसभर हजारोच्या संख्येने मेसेज पाठवणार्यांवर लक्ष ठेवले जाते. सेव नसलेल्या मेसेजवरून येणार्या मेसेजवर सुद्धा लक्ष ठेवले जाते. अशी अकाऊंट बॅन केली जातात. पॉर्न विशेषता चाईल्ड पॉर्न पाठवल्यास अकाऊंट थेट बॅन केले जाते. यामुळे जेलमध्ये सुद्धा जावे लागू शकते.
थर्ड पार्टी अॅप (Third party app)
व्हॉट्सअप थर्ड पार्टी अॅपच्या मदतीने व्हॉट्सअप वापराची परवानगी देत नाही. परंतु मार्केटमध्ये WhatsApp Mode, WhatsSpp Pulse, GB WhatsApp नावाचे अनेक अॅप आहेत. व्हॉट्सअप अशा अॅपचे दरमहिन्याला स्कॅनिंग करते. थर्ड पार्टी अॅप चालवणारी अॅप बॅन केली जातात.
व्हॉट्सअप हॅक (whatsapp Hack)
जर कुणी व्हॉट्सअप हॅक करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्याविरोध कठोर कारवाई केली जाते. नोटीस पाठवली जाते. यासाठी दंड किंवा जेल सुद्धा होऊ शकते.
गुन्ह्यात सहभाग असेल तर (involved in crime)
सुरक्षा एजन्सीजच्या तक्रारीवर व्हॉट्सअप अकाऊंट बॅन करते. तसेच जातीय दंगल भडकवणारे मेसेज फॉरवर्ड केल्या अकाऊंट बॅन होऊ शकते, जेलमध्ये जावे लागू शकते.
कॉपी-राईटचे उल्लंघन (Copyright infringement)
व्हॉट्सअपवरून एखादी फिल्म किंवा इतर साहित्याचे पायरेसी केल्यास अकाऊंट बॅन होऊ शकते. सोबतच पोलीस तक्रार झाल्यास जेल सुद्धा होऊ शकते.
Web Title :- whatsapp tech guide whatsapp account will be banned for this act may have to go to jail
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 333 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी