बहुजननामा ऑनलाईन – सध्या व्हॉट्सअॅपचे खूप जास्त युझर्स झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांचा विचार करून नवनवीन फिचर अपडेट केले जातात. जे त्यांच्यासाठी फायद्याचे आहेत. आता व्हॉट्सअॅपने पुन्हा नवीन फिचर आणले आहेत. या फिचरमुळे वापरकर्त्यांना इन्स्टाग्रामसारखे बुमरँग व्हीडओ बनवता येऊ शकणार आहेत. कारण ग्राहकांना इन्स्टाग्रामवरील बुमरँग हे फिचर जास्त आवडते. त्यामुळेच व्हॉट्सअॅपने हे फिचर आणले आहे.
या फिचरचा उपयोग करून व्हॉट्सअॅप युजर्स बुमरँग व्हिडिओ तयार करून मित्रांना पाठवू शकतात. तसंच हे बुमरँग व्हिडिओ व्हॉट्सअॅप स्टेटसमध्येही ठेवता येणार आहेत.
असे आहे हे फिचर –
या बुमरँग फिचरमध्ये ७ सेकंदांचा व्हीडिओ असणार आहे. यूजर्स या व्हीडिओचे रुपांतर जीआयएफमध्ये करू शकतो. काही महिन्यांपूर्वीच व्हॉट्सअॅपने हे फिचर लाँच केले. यासाठी व्हीडिओ एडिटमध्ये पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. हे नवीन फिचर आधी आयओएस स्मार्टफोनमध्ये दिसेल. त्यानंतर सामान्य अँड्रोइड ग्राहकांसाठी हे फिचर अपडेट केलं जाणार आहे. दरम्यान, व्हॉट्सअॅपने फिचर लाँच करण्याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. तसंच व्हॉट्सअॅप बुमरँग फिचरबरोबरच आणखी एक फिचर आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.