कॅलिफोर्निया : वृत्तसंस्था – व्हॉट्सअॅपने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन फीचर लॉन्च केले आहे. ज्यामुळे वापरकर्त्याला व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये समाविष्ट व्हायचे कि नाही हे निवडण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे . व्हॉट्सअॅपच्या या नवीन वैशिष्ट्यामुळे आता वापरकर्ते निरर्थक संदेश आणि मिम्स टाळण्यास सक्षम असतील. व्हाट्सएपने हे नवीन फीचर प्रायव्हसी सेटिंगमध्ये ठेवले आहे. या माध्यमातून आपण आपल्या काही कॉन्टॅक्ट नंबरला ग्रुपमध्ये रोखू शकता. ग्रुपमध्ये समाविष्ट करण्यासाठी तुम्हाला आधी वैयक्तिकरित्या वापरकर्त्याला लिंक पाठवावी लागेल. या लिंकच्या माध्यमातून वापरकर्त्याला व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जाण्यासाठी तीन दिवसांचा अवधी मिळेल. या दरम्यान, विनंती न स्वीकारल्यास दुव्याची वैधता कालबाह्य होईल.
हे वैशिष्ट्य कसे वापरावे :
१) व्हॉट्सअॅपच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या तीन ठिपांवर क्लिक करा
२)सेटिंग्ज पर्यायावर क्लिक करा आणि प्रायव्हसी ऑप्शनवर क्लिक करा
३) यानंतर आपल्याला तीन पर्याय दिसतील, यात Everyone, My contacts और My contacts except हे पर्याय असतील, त्यात My contacts except वर क्लिक करून आपणास गटात कोण जोडावे हे निवडू शकता.
अलीकडेच व्हॉट्सअॅपने वापरकर्त्यांसाठी आणखी एक फिचर आणले आहे. यात युजर्सना नवीन इमोजी मिळत आहेत. याशिवाय लवकरच डॉक मोड आणि फिंगरप्रिंट लॉक समर्थनही व्हॉट्सअॅपवर मिळू शकेल. मिळालेल्या माहितीनुसार, नवीन अपडेटमध्ये यूजर्सला इमोजी, कलर ब्लॉक्स मिळत आहेत. यासह, इमोजीच्या डिझाइनमध्ये थोडा बदल झाला आहे. युनिकोड स्टँडर्ड सपोर्टही व्हॉट्सअॅपवर अपडेटद्वारे आला आहे.
Visit : bahujannama.com