नवी दिल्ली : वृत्त संस्था – इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सॲप खुप पॉप्युलर आहे. याच कारणामुळे हे स्कॅमर्सच्या निशाण्यावर सुद्धा सतत असते. स्कॅममुळे व्हॉट्सॲप युजर्सची सिक्युरिटी अनेकदा धोक्यात येते. आता यावर सुरूअसलेल्या एका नवीन स्कॅमबाबत सावध करण्यात आले आहे.
आता ज्या स्कॅमबाबत सांगण्यात आले आहे, त्याद्वारे हॅकर्स व्हॉट्सॲप अकाऊंट आणि पर्सनल मेसेजचा अॅक्सेस घेऊ शकतात. यामुळे यूजर्सचा पर्सनल डेटा सुद्धा चोरी होण्याचा धोका वाढला आहे. हा व्हॉट्सॲप फ्रॉड मागील वर्षीसुद्धा चर्चेत आला होता.
या व्हॉट्सॲप फ्रॉडबाबत डेली एक्स्प्रेसने रिपोर्ट केले आहे. त्यानुसार व्हॉट्सॲपवरून यूजर्सला एक मेसेज सेंड केला जात आहे. या मेसेजमध्ये यूजर्सला सांगितले जात आहे की, त्यांच्याकडे चुकीने 6 अंकी कोड गेला आहे. तो तुम्ही आम्हाला परत पाठवा.
या स्कॅममध्ये यूजर्सला विश्वास दिला जातो की, हा एक ऑथेंटिक मेसेज आहे. हॅकर्स फेक मेसेजवरून यूजर्सला सिक्युरिटी कोडद्वारे टार्गेट करतात. हा मेसेज असा वाटतो जसे की एखाद्या मित्राने तो चुकीने पाठवला आहे आणि तो सिक्युरिटी कोड मागत आहे.
अशाप्रकाच्या मेसेजवर विश्वास ठेवून अनेक यूजर्स सहा अंकी कोड सेंड करतात. ही खुप मोठी चुक असते. हा व्हेरिफिकेशन कोड व्हॉट्सॲपचा कोड असतो. जेव्हा तुम्ही नवीन डिव्हाईसमध्ये लॉगिन करता तेव्हा व्हॉट्सॲपकडून तुम्हाला व्हेरिफिकेशन कोड सेंड केला जातो.
हॅकर्सला याच कोडचा अॅक्सेस हवा असतो जेणेकरून तुमच्या व्हॉट्सॲप अकाऊंटचा अॅक्सेस घेता येईल. जर अशाप्रकारचा कोणताही मेसेज तुम्हाला मिळाला तर त्या सेंडरला ब्लॉक करा. यूजर्सने चुकूनही हा कोड हॅकर्सला सेंड करू नये.