बहुजननामा ऑनलाइन टीम : आजकाल स्मार्टफोन वापरण्याचे क्रेझ सगळीकडे दिसून येत आहे. स्मार्टफोनचा वापर जास्त प्रमाणात होत आहे. स्मार्टफोनमध्ये बरेच फिचर्स असतात. लोक जास्तीत जास्त स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅपचा वापर करतात जे लोक व्हॉट्सअॅपचा वापर स्मार्टफोनमध्ये करतात त्यांच्यासाठी एक वाईट बातमी आहे. लवकरच स्मार्टफोनमधील व्हॉट्सअॅप बंद होण्याची शक्यता आहे.
व्हॉट्सअॅपने आपल्या काही यूजर्ससाठी वाईट बातमी आणली आहे. लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये अशा ऑपरेटिंग सिस्टमविषयी माहिती दिली आहे. त्यामुळे युजर 31 डिसेंबर 2019 पासून व्हॉट्सअॅप वापरु शकणार नाहीत. चला जाणून घेऊया कोणते युजर आहेत जे व्हॉट्सअॅपचा वापर करु शकणार नाही.
व्हॉट्सअॅपने आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे की, जर तुम्हाला विंडोज फोन वापरायचा असेल आणि व्हॉट्सअॅप वापरायचा असेल तर 31 डिसेंबर 2019 पूर्वी तुम्हाला नवीन फोन घ्यावा लागेल. म्हणजेच 31 डिसेंबरपासून व्हॉट्सअॅप विंडोज ऑपरेटिंग सिस्टमवर काम करणे बंद करणार आहे. व्हॉट्सअॅपने काही काळापूर्वी म्हटले होते की, येणाऱ्या सात वर्षात ते अशा मोबाईलवर लक्ष केंद्रित करतात जे लोक जास्तीत जास्त मोबाईलचा वापर करतात.
Visit : bahujannama.com