बहुजननामा ऑनलाईन – व्हाॅट्सअॅपने आता आपल्या युजर्ससाठी असे फिचर सादर केले आहे ज्याची अनेक वर्षांपासून वाट बघत होता. व्हाॅट्सअॅपने अँड्रॉइड आणि iOS या दोन युजर्ससाठी Dark Mode हे फिचर रोलआऊट केले आहे. व्हाॅट्सअॅपने आपल्या ब्लॉग पेजवर माहिती देत ‘आम्हाला सांगताना आनंद होत आहे की, व्हाॅट्सअॅप आपल्या युजर्ससाठी ‘डार्क मोड’ फिचर आणले आहे. अनेक युजर्स या फीचरची मागणी बऱ्याच काळापासून करत होते,’ असे लिहिले आहे.
पुढे सांगितले की, हे नवीन फीचर अशा प्रकारे डिजाईन केले आहे की, जर तुम्ही कमी प्रकाशात फोनचा वापर केला तर युजर्सच्या डोळ्यांवर जास्त जोर पडणार नाही. आशा आहे की, यामुळे युजर्सची ही पण अडचण दूर होईल, जेव्हा कॉल येतो तेव्हा पूर्ण रूममध्ये फोनची लाईट चमकते. डार्क मोड फीचरला डिजाईन करताना आम्ही खासकरून दोन गोष्टींवर रिसर्च केले आहे.
या फीचरला ऑन करून वाचायला कसे वाटेल-
रंग निवडताना व्हाॅट्सअॅपचे पूर्ण लक्ष डोळ्यांवर कमीत कमी जोर पडण्यावर असेल. सोबतच व्हाॅट्सअॅप अशा रंगांचा वापर करणार होते जो iPhone आणि Android या सिस्टीमच्या डिफॉल्ट रंगासारखे असतील.
Finally. Dark mode on WhatsApp. #DarkMode pic.twitter.com/o4Ee5H7qpW
— WhatsApp (@WhatsApp) March 3, 2020
प्रत्येक महत्वाच्या माहितीकडे लक्ष दिले जाईल-
अॅपच्या प्रत्येक स्क्रीनवर युजर्सने लक्ष द्यावे अशी त्यांची इच्छा असल्याचे व्हॉट्सअॅपने म्हटले आहे. म्हणूनच अॅपमध्ये रंग आणि काही भिन्न डिझाइन वापरले गेले जेणेकरुन आवश्यक माहिती दिसून येईल. Android 10 आणि iOS 13 वापरणारे युजर्स सिस्टम सेटिंग्जमध्ये जाऊन डार्क मोड चालू करू शकतात. अँड्रॉइड 9 किंवा पूर्वीचे वापरकर्ते WhatsApp Setting > Chat > Theme जाऊन ‘Dark Mode’ निवडून हे वैशिष्ट्य चालू करू शकतात. व्हाॅट्सअॅपने सांगितले की, येत्या काही दिवसांत हे फीचर व्हाॅट्सअॅपच्या नवीन व्हर्जनमध्ये उपलब्ध होईल. व्हाॅट्सअॅपला आशा आहे की सर्व वापरकर्ते ‘डार्क मोड’ चा आनंद घेतील, असेही त्यांनी म्हटले आहे.