नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने इन्स्टंट मेसेज अॅप WhatsApp ला टक्कर देण्यासाठी स्वदेशी पर्याय संदेस (Sandes) नावाचे अॅप विकसित केले आहे. मात्र, अजूनपर्यंत याचा वापर केवळ सरकारी कर्मचारी आणि त्या एजन्सींमध्ये अंतर्गत प्रकारे केला जात आहे, ज्या सरकारशी संबंधीत आहेत. व्हॉट्सअपप्रमाणे (WhatsApp) नवीन एनआयसी प्लॅटफॉर्मचा वापर कोणत्याही व्यक्तीचा मोबाइल नंबर किंवा ईमेलसोबत सर्व प्रकारच्या कम्युनिकेशनसाठी केला जाऊ शकतो. संदेस का बनवण्यात आले आहे आणि ते कसे काम करते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
हे स्वदेशी मेसेजिंग अॅप विकसित करण्याचा विचार मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळातच आला होता. मात्र यावर प्रत्यक्ष काम 2020 च्या प्रारंभी सुरू झाले. मार्च 2020 मध्ये कोरोना महामारी पसरली आणि देशव्यापी लॉकडाऊन लावला गेला तेव्हा सरकारने ही प्रक्रिया वेगाने ट्रॅक केली, कारण घरातून काम करताना संवेदनशील धोरणात्मक प्रकरणावर संवाद करणार्या सरकारी कर्मचार्यांमध्ये सुसंवादाची आवश्यक जाणवत होती. एनआयसीने आपले व्हर्जन ऑगस्ट 2020 मध्ये जारी केले.
अधिकृत चर्चा सुरक्षित करण्यासाठी हाय लेव्हल चर्चेनंतर राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राने (एनआयसी)
गव्हर्मेंट इन्स्टंट मेसेजिंग सिस्टम (जीआयएमएस) वर काम करणे सुरू केले, जो एक ओपन सोर्स,
क्लाउड इनेबल्ड, एंड टू एंड एनक्रिप्टेड ओपन सोर्स प्लॅटफॉर्म आहे, जो भारत सरकारच्या डेटा
सेंटरवर होस्ट केला आहे. संदेस सरकार आणि नागरिकांमध्ये ताबडतोब आणि सुरक्षित मेसेज
पाठवण्यासाठी एनआयसीकडून विकसित करण्यात आलेला स्वदेशी प्लॅटफॉर्म आहे.
इतर अॅपप्रमाणे यात प्रथम यूजरला रजिस्ट्रेशनसाठी एक वैध मोबाइल नंबर किंवा ईमेल आयडी द्यावा लागेल. Sandes च्या अँड्रॉइड आणि iOS व्हर्जन https://gims.gov.in वर उपलब्ध आहे. संदेसमध्ये ईमेल आणि मोबाइल आधारित सेल्फ रजिस्ट्रेशन, वन-टू-वन आणि ग्रुप मेसेजिंग, फाईल आणि मीडिया शेयरिंग, ऑडियो व्हिडिओ कॉलसह चॅटबोट सक्षम डॅशबोर्ड आहे.
Web Title :- whatsapp central government developed sandes app to compete whatsapp
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Union Home Ministry | केंद्राच्या राज्यांना महत्वाच्या सूचना; 31 ऑगस्टपर्यंत निर्बंध कडक ठेवा
Shilpa Shetty | शिल्पा शेट्टीच्या आईची फसवणूक, जुहू पोलीस ठाण्यात FIR दाखल, जाणून घ्या प्रकरण