नवी दिल्ली : वृत्त संस्था – WhatsApp | मेसेजिंग सेवा कंपनी WhatsApp ने यावर्षी 15 मेपासून 15 जूनच्या दरम्यान 20 लाख भारतीय अकाऊंट(Indian account)वर प्रतिबंध लावला. तर या दरम्यान त्यांना तक्रारीचे 345 रिपोर्ट मिळाले. कंपनीने आपल्या मासिक पालन अहवालात ही माहिती दिली.
नवीन माहिती तंत्रज्ञान नियमां(New information technology rules)तर्गत हा रिपोर्ट सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. नवीन नियमांच्या अंतर्गत 50 लाखापेक्षा जास्त वापरकर्त्यांच्या प्रमुख डिजिटल व्यासपीठां(Digital platform)साठी दर महिना पालन अहवाल प्रकाशित करणे आवश्यक आहे. या रिपोर्टमध्ये या व्यासपीठांसाठी त्यांना मिळणार्या तक्रारी आणि त्यावर करण्यात येणार्या कारवाईचा उल्लेख करणे आवश्यक आहे.
व्हॉट्सॲप?(WhatsApp)ने गुरूवारी म्हटले, आमचे मुख्य लक्ष खात्यांना मोठ्या प्रमाणात हानिकारक किंवा अवांछित मेसेज पाठवण्यापासून रोखणे आहे. आम्ही मोठ्या किंवा असामान्य दराने मेसेज(Message) पाठवणार्या या खात्यांची ओळख पटवण्यासाठी प्रगत क्षमता तयार केल्या आहेत आणि एकट्या भारतात 15 मेपासून 15 जूनपर्यंत अशाप्रकारच्या दुरुपयोगाचा प्रयत्न करणार्या 20 लाख खात्यांवर प्रतिबंध(Restrictions) लावला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
कंपनीने स्पष्ट केले की, 95 टक्केपेक्षा जास्त असे प्रतिबंध स्वयंचालित किंवा बल्क मेसेजिंग(Bulk messaging) (स्पाम) चा अनधिकृत वापर केल्याने लावण्यात आला आहे. फेसबुकच्या मालकीच्या या कंपनीने सांगितले की, प्रतिबंध लावलेल्या खात्यांची संख्या 2019 च्यानंतर वाढली आहे.कारण आमची प्रणाली जास्त प्रगत झाली आहे आणि अशाप्रकारच्या जास्त खात्यांचा शोध घेण्यात मदत होत आहे.
व्हाट्सॲप जगभरात दर महिन्याला सरासरी सुमारे 80 लाख खात्यांवर प्रतिबंध लावते किंवा ती निष्क्रिय करते.
गुगल, कू, ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्राम दुसर्या सोशल मीडिया व्यासपीठांनी सुद्धा आपला पालन अहवाल सोपवला आहे.
web title: WhatsApp bans 20 lakh Indian accounts in a month, the company said in its first monthly compliance report.
Akola Crime | जमिनीच्या वादातून लहान भावाने केली थोरल्या भावाची हत्या
Pimpri Crime | अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे 12 वर्षाच्या मुलाची आत्महत्या
Pune Crime | पुण्यात पतीचा खून करुन फासावर लटकवले; अंत्यसंस्काराच्यावेळी मुलीनं सर्व काही सांगितलं