नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल नेटवर्किंग अॅप पैकी सर्वाधिक लोकप्रिय सोशल नेटवर्किंग अॅप म्हणजे व्हॉट्सअॅप. व्हॉट्सअॅपने आपलया ग्राहकांकरिता नेहमी काहीतरी नवनवीन देण्याचा प्रयत्न केला आहे. लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने नवीन वर्षात आपल्या युजर्ससाठी काही दमदार फीचर्स आणले आहेत. यामुळे व्हॉट्सअॅपवरच्या चॅटींगची गंमत आणखी वाढणार आहे. असंच एक भन्नाट फीचर व्हॉट्सअॅप लवकरच आणणार आहे. डिसअॅपेरिंग मेसेज असं या नव्या फीचरचं नाव असून यामध्ये मेसेजचा वेळ ठरवता येणार आहे.
ठरवता येणार मेसेजचं आयुष्य
WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅप एका भन्नाट फीचरवर काम करत आहे. यामध्ये पाठवलेला मेसेज किती वेळ दिसेल याची वेळ पाठवणाऱ्याला ठरवता येणार आहे. म्हणजेच एखाद्याने मेसेज केला तर त्या मेसेजचे आयुष्य ठरवता येणार आहे. ही वेळ संपल्यानंतर चॅट आपोआप डिलीट होणार आहे. व्हॉट्सअॅपमध्ये लवकरच डिसअॅपेरिंग हे फीचर देण्यात येणार आहे. हे सिलेक्ट केल्यावर सर्व चॅट गायब होणार आहे. टेलिग्राम अॅपवर हे फीचर आधीपासूनच उपलब्ध आहे. व्हॉट्सअॅपवर सध्या पाठविलेले मेसेज हे पाठवणाऱ्याकडून डिलीट करता येतात. यावेळी मेसेज डिलिटेड असे दिसते. परंतू नव्या फीचरमध्ये हे दिसणार नाही. टाईम एक्स्पायर असे दिसण्याची शक्यता असल्याची माहिती मिळत आहे. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कॉल वेटिंग फीचर
व्हॉट्सअॅप युजर्ससाठी आणखी एक खूशखबर आहे कारण व्हॉट्सअॅपने एक जबरदस्त फीचर आणलं आहे. कॉल वेटिंग हे नवं फीचर देण्यात आलं असून यामध्ये कॉलच्या दरम्यान व्हॉट्सअॅपवर चॅट करता येणार आहे. कंपनीने आयओएस व्हर्जनसाठी हे खास फीचर रोलआऊट केले आहे. तसेच अपडेटमध्ये चॅट स्क्रीनही अधिक चांगली देण्यात आली आहे.
व्हॉट्सअॅप मल्टिपल डिव्हाईस सपोर्ट फिचर
व्हॉट्सअॅप युजर्स ऑडिओ कॉल दरम्यान वेटिंग कॉल उचलू शकतात. कॉलिंगला महत्त्व देणाऱ्या युजर्ससाठी ही सुविधा फायदेशीर असणार आहे. या फीचरच्या मदतीने वेटिंग कॉल कट करण्याची तसेच सुरू असलेला कॉल थांबवून नवा कॉल रिसीव्ह करता येणार आहे. एका ठिकाणी व्हॉट्सअॅप लॉग इन असेल तर ते लॉग आऊट केल्याशिवाय दुसरीकडे लॉग इन करता येत नाही. मात्र आता एकाच वेळी अनेक ठिकाणी व्हॉट्सअॅप चालणार आहे म्हणजेच अनेक ठिकाणी लॉग इन करता येणार आहे. सध्या व्हॉट्सअॅप मल्टिपल डिव्हाईस सपोर्ट फीचरवर काम करत आहे. आयफोन युजर्ससाठी रजिस्ट्रेशन नोटिफिकेशन फीचर रोलआऊट केलं आहे.
Visit : bahujannama.com