मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Mukesh Ambani | देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज ( Reliance) ची ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज गुरुवारी होत असून त्यात समुहाचे अध्यक्ष उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) काय घोषणा करणार याकडे संपूर्ण देशवासियांचे लक्ष लागले आहे.
या सभेमध्ये मुकेश अंबानी (Mukesh Ambani) अनेक महत्वाच्या घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिओ सह अनेक टेलीकॉम कंपन्यांना देशामध्ये ५ जी सेवांचे परिक्षण करण्यास दूरसंचार विभागाने परवानगी दिली आहे. नुकतीच मुंबईमध्ये जियो (jio) ने 5G फील्ड टेस्टिंग(5G field testing) केली आहे. लवकरच इतर शहरांमध्ये त्याची चाचणी केली जाणार आहे. आजच्या सर्वसाधारण सभेमध्ये याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे. ही सर्वसाधारण सभा दुपारी २ वाजता सुरु होणार आहे.
त्याचबरोबर स्वस्तातील 5G मोबाईल फोन, लॅपटॉप(5G mobile phones, laptops) यांचीही घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मुकेश अंबानी आपले तेलपासून रसायनच्या कारभारातील २० टक्के भागीदारी सौदी अरामको Saudi Aramco याला विकण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे.
कंपनीची सर्वसाधारण सभा वानखेडे स्टेडियम(Wankhede Stadium) मध्ये घेण्याची परंपरा मुकेश अंबानी यांनी सुरु केली होती.
मात्र, कोरोनाच्या संसर्गामुळे गेल्या वर्षीपासून ही सर्वसाधारण सभा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होत आहे.
web title: what will mukesh ambani announce today likely chances of 5g to be announced
pune crime mocca | मोक्क्यातील सराईत गुन्हेगार विवेक शेवाळे गजाआड
Life insurance जर लॅप्स झाली तर ती सुरू करण्याची कोणती आहे पद्धत, जाणून घ्या येथे
Burglary in Pune | धनकवडी परिसरातील फ्लॅट भरदिवसा फोडला, 5 लाखाची रोकड चोरली