• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

‘त्या’ मुलांवरून धनंजय मुंडेंच्या आमदारकीचे काय होणार ? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

by sheetal
January 13, 2021
in राजकीय
0
out of our minds

out of our minds

बहुजननामा ऑनलाइन टीम –  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने चित्रपटांत काम देण्याच्या नावाखाली वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक आरोप केला. (Dhananjay Munde)यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. या महिलेचे आरोप म्हणजे ब्लॅकमेल करण्याचा प्रकार असल्याचे सांगत मुंडे यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. तसेच आरोप करणाऱ्या महिलेच्या बहिणीशी आपले परस्पर सहमतीने संबंध होते. या संबंधातून दोन मुले झाली असून त्यांचा सांभाळही आपण करत आहोत, असा खुलासा केला होता. यामुळे मुंडे यांची आमदारकी धोक्यात आहे का? निवडणूक आयोग त्यावर कारवाई करू शकतो का, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. आमदारकी रद्द होण्याबाबत काही तज्ज्ञांनी मते नोंदविली आहेत.

प्रतिज्ञापत्रात 3 नावे कोणाची?

धनंजय मुंडे यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात तीन मुलींची नावे दिलेली आहेत. मात्र, विवाहबाह्य संबंधातून दोन अपत्य असल्याची माहिती दिली नसल्याने ते अडचणीत येण्याची शक्यता आहे. यामध्ये कायदेशीर पत्नीच्या नावाचा आणि तिच्यापासून असलेल्या तीन मुलींचा उल्लेख आहे.

आमदारकी रद्द होण्याबाबत काही तज्ज्ञांनी मांडलेली मते पुढीलप्रमाणे :

राजकीय प्रतिमेवर परिणाम होऊ शकतो : बापट

राज्यघटनेचे अभ्यासक उल्हास बापट यांनी म्हटले आहे की, विवाहबाह्य संबंधांमधून जन्मलेल्या अपत्यांची माहिती प्रतिज्ञापत्रात देण्याचा कोणताही नियम नाही. यामुळे धनंजय मुंडे यांनी माहिती लपविली असे होत नाही. मुलांना आपे नाव देणे म्हणजे त्यांचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात झाला पाहिजे असे नाही. यामुळे निवडणूक आयोग यावर कारवाई करेल असे वाटत नाही. परंतू याचा राजकीय प्रतिमेवर परिणाम होऊ शकतो.

मुलांची नावे न दिल्याने काही फरक पडणार नाहीः ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ तांदुळेकर

ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ जे. के. तांदुळेकर म्हणाले की, ‘धनंजय मुंडे यांनी उच्चन्यायालयात प्रतिज्ञापत्र दिले आहे. यामुळे या प्रकरणावर जास्त बोलू शकत नाही. महिलेशी संमतीने संबंध व तिच्यापासून दोन मुले असल्याने, त्यांच्या शिक्षणाचा खर्च-नाव धनंजय मुंडे करत असल्याने त्यांच्यावर गुन्हा होऊ शकत नाही. तसेच निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात दोन मुलांची नाव न दिल्याने काही समस्या येणार नसल्याचे ते म्हणाले.

निवडणूूक आयोगाकडे कुणी तक्रार केली तरच कारवाईः अ‍ॅड सरोदे

तर वकील असीम सरोदे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई होऊ शकते, असे सांगितले. निवडणुकीच्या आधी उमेदवाराने जी माहिती माहिती द्यायची असते त्यामध्ये कायदेशीर बायकोची माहिती देणेच आवश्यक आहे. त्याअर्थाने धनंजय मुंडे यांनी बायको बद्दलची माहिती लपविली असे म्हणता येत नाही. पण मुलांची माहिती त्यांनी लपविली आहे. असे खोटे व दिशाभूल करणारे प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगासमोर दाखल करणे ही गंभीर कायदेशीर चूक आहे. कुणी तक्रार केली तर निवडणूक आयोग याप्रकरणी धनंजय मुंडे यांचे लोकप्रतिनिधीत्व म्हणजेच आमदारकी रद्द करू शकते. निवडणूक आयोगाने स्वतःहून अश्या प्रकरणांमध्ये गंभीर दखल घेतल्याची उदाहरणे नाहीत, असे ज्येष्ठ संविधान विश्लेषक कायदेतज्ज्ञ अ‍ॅड. असीम सरोदे यांनी सांगितले.

Tags: childrenDhananjay Mundeopinions of expertsआमदारकीतज्ज्ञांचे मत
Previous Post

Pune News : मार्केटयार्ड परिसरातील महिला डॉक्टरकडे 5 लाखाच्या खंडणीची मागणी, FIR दाखल

Next Post

Pune News : विद्यार्थ्यांना रिक्‍त जागेवर प्रवेश द्या, महाराष्ट्र नागरिक कृती समितीची मागणी

Next Post
Admission of students

Pune News : विद्यार्थ्यांना रिक्‍त जागेवर प्रवेश द्या, महाराष्ट्र नागरिक कृती समितीची मागणी

Please login to join discussion
ताज्या बातम्या

‘स्टार्च हवंय विचारांना’ काव्यसंग्रह प्रकाशना प्रसंगीं वक्तृत्व शैलीतून मराठी भाषेचे महत्व दिले पटवून

January 24, 2021
0

मुरबाड : बहुजननामा ऑनलाईन - काव्य संमेलन म्हटले की कवीना आपल्या काव्य तुन जनजागृती, विचार मांडून आपल्या कवितेच्या माध्यमातून संकल्पना...

Read more

लोकसभा सचिवालयात 12 वी ते MBA उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी, 90 हजार पगार, जाणून घ्या

January 24, 2021

UP : परवान्याशिवाय मर्यादेपेक्षा जास्त दारू ठेवल्यास होणार कारवाई, 51000 ची द्यावी लागणार हमी

January 24, 2021

जातीनिहाय जनगणनेची पंकजा मुंडेंनी केंद्र सरकारला करुन दिली आठवण

January 24, 2021

Pimpri News : वैधानिक इशारा न छापलेल्या ‘उंची’ विदेशी सिगारेटचा साठा जप्त

January 24, 2021

BSNL 4G सिम कार्ड मिळतेय फ्री, जाणून घ्या ‘ऑफर’

January 24, 2021

वादग्रस्त वक्तव्यामुळे साक्षी महाराज पुन्हा चर्चेत, म्हणाले – ‘काँग्रेसनेच सुभाषचंद्र बोस यांची हत्या केली’

January 24, 2021

मोदी सरकार 19 कोटी EPF खातेधारकांसाठी करू शकतं मोठी घोषणा, जाणून घ्या कोणाला होईल फायदा

January 24, 2021

Pune News : पुण्याला हक्काचे 16 TMC पाणी मिळालेच पाहिजे – माजी आमदार मोहन जोशी

January 24, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

out of our minds
राजकीय

‘त्या’ मुलांवरून धनंजय मुंडेंच्या आमदारकीचे काय होणार ? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

January 13, 2021
0

...

Read more

पतीच्या कडेवरच बसली अभिनेत्री प्रीती झिंटा ! शेअर केला ‘असा’ रोमँटीक फोटो

3 days ago

… तर भाजपने तांडव केल असतं, अर्णब गोस्वामी प्रकरणावरून खासदार राऊतांचा निशाणा

2 days ago

Pune News : केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते जनसेवा फाऊंडेशनचे राजेश शहा सन्मानित

6 days ago

Pune News : ‘जमात-ए-इस्लामी हिंद’ महाराष्ट्र द्वारे अंधारातून प्रकाशाकडे राज्यव्यापी अभियानाचे आयोजन

5 days ago

Corona Vaccine : देशातील ‘या’ मोठ्या कंपन्या करणार कर्मचाऱ्यांचे लसीकरण, लस खरेदीची चर्चा सुरू

5 days ago

तुमचं लग्न ठरलंय ? मग फॉलो करा या ‘ब्रायडल ब्युटी रूटीन, येईल नैसर्गिक ग्लो

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat