बहुजननामा ऑनलाइन टीम : काल सोमवारी (9 डिसेंबर) रोजी नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत 311 विरुद्ध 80 मतांनी झाले आहे. लोकसभेत शिवसेनेने नागरिकत्व सुधारणा विधेयकाला समर्थन करत सरकारच्या बाजूने मतदान केले. मात्र, लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेनं राज्यसभेत वेगळी भूमिका घेण्याचे संकेत दिले आहे. याविषयी शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी माहिती दिली आहे. मात्र, राज्यसभेत विधेयकाला पाठिंबा देणार की विरोध करणार या प्रश्नावर त्यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले आहे.
शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. शिवसेनेने लोकसभेचे नागरिकत्व सुधारणा विधेयकाला पाठिंबा दिला आहे. असे असले तरी राज्यसभेमध्ये शिवसेना या विधेयाकाबाबत वेगळा विचार करु शकते. या विधेयकात आम्ही काही बदल सुचविले आहे. त्याबाबत आम्ही प्रश्न विचारणार आहोत, असे संजय राऊत यांनी सांगितले आहे.
नागरिकत्व दुरुस्ती विधेयक वादळी चर्चेनंतर सोमवारी मध्यरात्री लोकसभेत मंजूर झाले. विधेयकाच्या बाजूने 311 तर विरोधात 80 मते पडली. आता राज्यसभेत हे विधेयक मंजूर करताना सरकारची कसोटी लागणार आहे. हे विधेयक पारित करून घेण्यासाठी भाजपाला इतर पक्षांवर अवलंबून राहावे लागणार आहे.राज्यसभेत सत्ताधारी भाजपकडे पूर्ण बहुमत नसले तरी विधेयक संमत करण्यासाठी पुरेसे संख्याबळ रालोआकडे असल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. केंद्र सरकारने या विधेयकाला राज्यसभेत करण्यासाठी तयारी सुरु केली आहे. यासाठी सत्ताधारी भाजपाने 10 आणि 11 डिसेंबरला आपल्या राज्यसभेतील खासदारांना व्हिप जारी केला आहे. दरम्यान, नागरिकत्व सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मदतानासाठी सादर करण्यात येईल, अशी शक्यता वर्तविण्यात येईल.
Visit : bahujannama.com