पुणे : बहुजननामा ऑनलाईन – सध्या नाराज असलेले भाजपचे नेते एकनाथ खडसे शिवसेनेत जाणार असल्याचे वृत्त भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. खडसेंची केंद्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि माझ्याशी भेट झाली असून त्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न चालू आहेत. तेव्हा ते शिवसेनेत जाणार असल्याच्या वृत्ताला काही अर्थ नाही, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. आज जळगावमध्ये खडसे, गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस या त्रिकुटाची भेटीदरम्यान यात नाराजीवर चर्चा झाली नसल्याचे खडसे यांनी सांगितले.
चंद्रकांत पाटील हे आज पुण्यात असताना त्यांना त्याबद्दल प्रश्न केला गेला. तेव्हा शिवसेनेकडे खडसे यांना देण्यासाठी आहे तरी काय ? कोल्हापूरमध्ये शिवसेना विरोधकांना जाऊन मिळाल्याने भाजपला अपयश आले. आम्हाला हरवण्यासाठी सर्वांना एकत्र यावे लागले असताना सोलापूर, सांगलीमध्ये आम्ही आलो हे लक्षात असू द्यावे, अशी खडसून टीका पाटील यांनी शिवसेनेवर केली आहे. सत्तेसाठी सरकारने इतर प्रश्न निर्माण करून ठेवले असून सत्तेच्या प्रश्नांचे त्यांना काहीही पडलेले नाही.
उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा कॅबिनेट मंत्री झाले. त्यांना इतरांबद्दल काहीही पडलेले नाही. तसेच रावते, गोगावले, जाधव यांना डावलले गेले असल्याचा आरोपही पाटील यांनी केला. विधानसभा अध्यक्षाची निवडणूक आजही गुप्त मतदानाद्वारे घेऊन दाखवावी, असे आव्हानच पाटील यांनी महाविकास आघाडीला दिले आहे.
Visit : bahujannama.com