चार वेळा पक्ष सोडून दुसरा काँग्रेस पक्ष स्थापन करणाऱ्या पवारांना पक्षांतरावर बोलण्याचा काय अधिकार ?

shivajirao-patil
August 2, 2019

पुणे बहुजननामा : ज्यांनी स्वतः चार – चार वेळा पक्ष सोडला , काँग्रेस मध्ये फूट पाडून मुख्यमंत्री झाले. नंतर स्वतःचाच वेगळा काँग्रेस पक्ष स्थापन केला. अशा पवारांना पक्षांतरावर बोलायचं काय अधिकार ? असा सवाल माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी उपस्थित केला.

शरद पवार यांनी काँग्रेस चे नुकसान केले आहे. स्वतः किती तरी वेळा पक्षांतर केला. काँग्रेस मध्ये फूट पाडली. त्यांनी जे पेरल , तेच उगवलं , त्यामुळे आज त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज त्यांची साथ सोडली आहे. स्वतः फूट पडून मुख्यमंत्री झाले आणि स्वतः पक्ष स्थापन केला तसेच पुलोदचा प्रयोग केला. त्यामुळे त्यांनी आता पक्षांतर या विषयावर बोलू नये , अशी टीका शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी केली.

राष्ट्रवादी पक्षातून भाजप मध्ये पक्ष स्थलांतराचे प्रमाण अधिक आहे, त्याला कारणही स्वतः पवारच आहेत. पवार यांनी कित्येकदा सहकाऱ्यांचे पराभव घडवून आणले, विलासराव देशमुख यांचा पराभव तसेच वसंतदादा यांच्या पाठीत खंजीर खुपसणारे पवारच आहेत. पवार हे देशाच्या राजकारणातील महत्वपूर्ण व्यक्तिमहत्व आहे. परंतु त्यांचे राजकीय मूल्य आता कमी झाल्याचे दिसत आहे. असे वक्त्यव्य निलंगेकर यांनी केले.

वैद्यकीय प्रवेशासाठी मुलींच्या गुणवत्तेत वाढ करण्याचा आरोपावरून मुख्यमंत्री पद सोडावे लागले. त्यामुळे आपले मुख्यमंत्री पद घालवण्यामागे देखील पवारांचाच हात आहे. असा आरोपही शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी केला. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्याप्रमाणेच कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी देखील पवारांवर अनेकांचे पक्ष फोडल्याचा आरोप करत ,करावं तसं भरावं या शब्दात टीका देखील केली आहे.