नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाच्या या महामारीत लोकांना कोणत्याही वेळी पैशाची आवश्यकता असते. यामुळे व्यक्ती पैसे कुठेतरी गुंतवू पाहत असते. व्यक्तीला नफा मिळवण्यासाठी सोपा मार्ग म्हणजे केवळ ५०० रुपयांपासून गुंतवणुकीला प्रारंभ करता येणार आहे. अशी एक योजना म्युच्युअल फंड, पद्धतशीर गुंतवणूक योजना मार्फत आहे. यामध्ये व्यक्तीला चांगला परतावा (refund) मिळणार आहे. या सोप्या योजनेमध्ये व्यक्ती सोयीनुसार Mutual funds, मध्ये एक विशेष रकम ठेऊ शकणार आहे. तर वर्ष २०१९-२० मध्ये पद्धतशीर गुंतवणूक योजना SIP द्वारे म्युच्युअल फंडामध्ये १ लाख कोटीपेक्षा जास्त रक्कम जमा झाली आहे. यावरून समजते की, म्युच्युअल फंडामध्ये किती मोठ्या प्रमाणात सेविंग होती आहे. तर काय आहे योजना समजून घ्या.
काय आहे SIP?
SIP म्हणजे Systematic Investment Plan कोणत्याही म्युच्युअल फंड योजनेमध्ये व्यक्ती SIP माध्यमातून कमीतकमी ५०० रुपये एवढी रकम आठवडा, महिना, ३ महिना, ६ महिना, तसेच, वर्ष या कालावधीत जमा करू शकतो. जेवढा अधिक अवधी गुंतवणूक कराल तितका अधिक नफा मिळणार आहे. मोजकेमोजके पैसे भरून काही कालावधीने १ मोठी रक्कम जमा होते. शेअरबाजारात थेट किंवा एक रकमी गुंतवणूक करू न शकणाऱ्या अशा व्यक्तीसाठी SIP हा एक सोपा मार्ग आहे.
ऑनलाइन SIP कशी सुरु कराल?
SIP सुरू करण्यासाठी, pancard , addresspruf , passport आकाराचे फोटो आणि चेकबुक आवश्यक आहे. म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यासाठी KYC प्रक्रिया आवश्यक आहे. ऑनलाइन sip सुरू करण्यासाठी ज्या फंडात गुंतवणूक करायची आहे, त्या फंड हाउसच्या वेबसाइटवर जाऊन व्यक्तीच्या आवडीनुसार sip निवडू शकणार आहे. यासाठी पूर्वी kyc नियम पूर्ण करणं आवश्यक आहे. नवीन खात्यासाठी आधी नोंदणी करा या लिंकवर जावे लागणार आहे. तिथं सुरु झालेल्या फॉर्ममध्ये सर्व वैयक्तिक तपशील आणि अन्य माहिती भरावी लागणार आहे. तेव्हा फॉर्म जमा होणार आहे. तसेच, ऑनलाइन व्यवहारासाठी व्यक्तीला १ username आणि password तयार करावा लागेल. याशिवाय sip पेमेंटसाठी बँक खात्याचा तपशील द्यावा लागेल. त्यानंतर, व्यक्तीच्या युजरनेमच्या आधारे लॉग इन केल्यावर त्याच्या आवडीची योजना निवडू शकणार आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर आणि फंड हाउसकडून त्याची खात्री झाल्यावर sip सुरू होते. तर १५ ते ४० दिवसाच्या कालावधीत sip सुरु होते.
SIP चा लाभ –
Equity अथवा डेट फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी SIP हा सोपा मार्ग आहे. याद्वारे, थोडी रक्कम तीही हप्त्यांमध्ये संरक्षित शेअरबाजारात गुंतवणूक करू शकतो. फंड हाउसला स्टॅडिंग इन्स्ट्रक्शन्स देऊन बँक खात्यामधून Auto debit ची सेवादेखील वापरता येते. त्यामुळे प्रतिमहिना व्यक्तीच्या बँक खात्यातून हप्त्याची रक्कम आपोआप वजा होणार आहे. SIP मध्ये व्यक्तीला कंपाउंडिंग अर्थात चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळणार आहे. व्यक्ती कोणत्याही म्युच्युअल फंडामध्ये १० टक्के दराने १ हजार रुपये गुंतवले तर त्याला एका वर्षात मिळणारे व्याज १०० रुपये असून, आगामी वर्षी त्याला मिळणारे व्याज हे ११०० रुपयावर असणार आहे.