नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शास्त्रज्ञांनी प्रथमच असे संकेत शोधले आहेत जे एका विशिष्ट अंतराने वारंवार अंतराळातून पृथ्वीवर येत आहे. तरीही त्याच्याशी संबंधित पैलू रहस्यमय आहेत. परंतु शास्त्रज्ञांनी या सिग्नलला एफआरबी असे नाव दिले आहे.
एफआरबी म्हणजे काय ?
असे नाही की अशी घटना प्रथमच ऐकली गेली आहे. यापूर्वीही अवकाशातून रहस्यमय रेडिओ सिग्नलच्या घटना घडल्या आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे या वेळी शास्त्रज्ञांनी जो सिग्नल शोधला आहे तो विशिष्ट कालावधी मधून आला आहे. याला एफआरबी असे नाव देण्यात आले आहे, म्हणजे ‘फास्ट रेडिओ बर्ट्स’. शास्त्रज्ञांच्या मते, हे संकेत पृथ्वीवरून सुमारे ५०० दशलक्ष (सुमारे ५० दशलक्ष) प्रकाश वर्ष दूर वरून येत आहे.
कसे झाले परीक्षण ?
कॅनडाच्या सीएचआयएमयच्या शास्त्रज्ञांनी ४०९ दिवस रेडिओ तरंगावर लक्ष दिले. मिळालेल्या माहितीनुसार हे तरंग अवकाशातून चार दिवस एक तासभर येत होते. त्याचा कालावधी खूप छोटा असतो आणि त्याचे येणे बंद झाल्यानंतर पुन्हा हीच प्रक्रिया बारा दिवसांसाठी पुन्हा सुरु होते.
काय आहे स्रोत ?
शास्त्रज्ञांसाठी अजूनही हे तरंग एक कोडेच आहे. जर याच्या स्रोतांचा तपास लागला तर हे कोठून येत आहेत याचे देखील माहिती मिळेल असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे वेगवेगळ्या स्रोतांमधून हे तरंग येत आहेत. शात्रज्ञांनी सांगितले की, सुरुवातीला फास्ट रेडियो बर्स्ट तारा किंवा धातूच्या एका छोट्या गॅलेक्सि मधून तरंग आले होते. तर दुसरा तरंग एफआरबी एक वेगळ्या आकाश गंगा सारख्या गोलसर गॅलेक्सि मधून आला होता.