बहुजननामा ऑनलाइन टीम – इंटरनेटवर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका बेडकाने जेव्हा एका काजव्याला खाल्ले तेव्हा त्याचा प्रकाश बेडकाच्या शरीरातून बाहेर येऊ लागला. ट्विटरवर हा व्हिडिओ ८४ हजाराहून अधिक लोकांनी पाहिला आहे.
१४ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये एक बेडूक भिंतीवर चिकटलेला दिसत आहे. काही सेकंदांनंतरच त्याच्या पोटात अचानक प्रकाश चमकू लागतो, त्यानंतर प्रकाश विझतो.
हा प्रकाश नियमित अंतराने चमकत होता, कारण बेडकाने अंधारात चमकणारा काजवा खाल्ला होता. रात्रीच्या वेळी चमकणाऱ्या काजव्यामुळे बेडकाच्या पोटातही त्याची चमक वारंवार दिसत होती.
यापूर्वी असा कोणताही व्हिडिओ ट्विटरवर पाहिला गेला नाही. ११ सप्टेंबर रोजी हा व्हिडिओ ट्विट होताच आतापर्यंत ८४ हजाराहून अधिक लोकांनी पाहिला आहे.
https://twitter.com/NaturelsLit/status/1304129916695273472
याबाबत सोशल मीडियावरही भन्नाट कमेंट्स येत आहेत. काहीजण त्याला चायनीज बेडूक म्हणत आहेत, तर काहीजण म्हणत आहेत की बेडकाची बॅटरी कमी झाली आहे.