कोलकत्ता : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालचे कामगार राज्यमंत्री झाकीर हुसैन यांच्या गाडीवर बॉम्ब फेकण्यात आला. या हल्ल्यात झाकीर हुसैन हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही धक्कादायक घटना मुशिर्दाबाद जिल्ह्यातील रघुनाथगंज परिसरात बुधवारी रात्री घडली.
झाकीर हुसैन हे कोलकत्ता येथे पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी निमतिता स्टेशनच्या दिशेने जात असताना त्यांच्या कारवर क्रुड बॉम्बचा हल्ला करण्यात आला. त्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यांना तात्काळ जंगीपूर महकमा स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथून त्यांना मुर्शिदाबाद मेडिकल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे.
West Bengal Labour Minister (MoS) Jakir Hossain injured after unidentified persons hurled crude bombs at him while he was walking towards Nimtita station to board train for Kolkata. He has been taken to a hospital.
— ANI (@ANI) February 17, 2021
झाकीर हुसैन यांच्यासोबत असलेले तृणमुल काँग्रेसचे काही कार्यकर्तेदेखील जखमी झाले आहेत.
दरम्यान, फुल बागान येथे काही जणांनी केलेल्या हल्ल्यात भाजपा उत्तर कोलकत्ता जिल्हा अध्यक्ष शिबाजी सिंघा रॉय हे जखमी झाले आहेत. त्यांच्याबरोबर सुवेंदू अधिकारी आणि शंकुदेव पांडा हेही जखमी झाले आहे.