पश्चिम बंगाल : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून, निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. नंदिग्राममध्ये दुसऱ्या टप्प्यात १ एप्रिल ला मतदान होणार असून. २ मे ला निकाल जाहीर होणार आहे. तर यामुळे प्रत्येक पक्षाला झुकून प्रचार करावा लागत आहे. ममता बॅनर्जी यांचे तृणमूल काँग्रेस आणि भाजप हे पक्ष आपली सत्ता काबीज करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. तर प्रचारादरम्यान चक्क मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एका चहाच्या टपरीवर त्या स्वत: चहा पातेल्यातून कागदी कपांमध्ये गाळून सर्वांना देत असल्याचा व्हिडीओ प्रसार माध्यमात प्रसारित झाला आहे.
Chai pe charcha! @MamataOfficial at a tea stall in Nandigram this evening! pic.twitter.com/eb0RuL8fbG
— Poulomi Saha (@PoulomiMSaha) March 9, 2021
प्रचारादरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जनता आपल्या पाठीशी आहे. आणि आपल्या या सामान्य कृतीतून विरोधकांना आपली तयारी असल्याचं दाखवून दिलं आहे. त्यांनी चहा गाळत असताना व्हिडीओ शूट करण्यासाठी तेथे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. तर ममतांचे जवळचे समर्थक सुवेंदू अधिकारी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये गेले. त्यामुळे तेथे सुवेंदू विरुद्ध ममता बॅनर्जी अशी दोघात लढत होणार आहे. बुधवारी तेथील उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी दोन दिवस ममता यांनी नंदिग्राममध्ये प्रचार केला. या दोन दिवसांच्या प्रचारात ममतां यांनी घेतलेल्या सभेत सुवेंदू अधिकारी यांचं नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला आहे. बाहेरून गुजरातमधून आलेल्यांकडे आपला ईमान विकणारे धर्माचं राजकारण करून नंदिग्राममधील आंदोलनाला बदनाम करत आहेत. नंदिग्रामची जनता तृणमूलच्या पाठीशी आहे ती त्यांना जागा दाखवेल असे त्यावेळी त्या म्हणाल्या आहेत.
दरम्यान, ममता बॅनर्जी २०१९ मध्ये दिघातील दत्तपूरमध्ये प्रशासकीय भेटी दरम्यानही तेथे चहाच्या टपरीवर चहा करून तो सर्वांना दिला होता. ‘कधीकधी छोटीशी कामं पण आपल्याला आनंद देतात. मस्तपैकी चहा तयार करून तो सर्वांना देणं हा त्यापैकीच एक आनंद. आज दत्तपूर दिघामध्ये. अशी पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर प्रसारित केली होती.