नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वेलस्पन इंडियाच्या सीईओ दीपाली गोयनका ऑफिसमधील कर्मचार्यांसह नाचत आहेत. (वेलस्पन इंडियाची सीईओ दिपाली गोयनका) दीपाली यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओचे बऱ्याच यूजर्सने कौतुक केले आहे. मंगळवारी समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये वेलस्पन इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहव्यवस्थापकीय संचालक ‘स्ट्रीट डान्सर 3 डी’ (मुक्ब्ला) या स्ट्रीट डांसर 3 डी चित्रपटाच्या गाण्यावर ‘मुकाब्ला’ गाण्यावर नाचताना दिसत आहेत. व्हिडिओच्या शेवटी, कर्मचाऱ्यांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या आहेत.
Rare to see a CEO dance and have fun in an office setting. That’s the way to create a happy culture @DipaliGoenka #welspun. pic.twitter.com/B6LAd2u3tr
— Harsh Goenka (@hvgoenka) February 18, 2020
ट्विटरवर आतापर्यंत हा व्हिडिओ १ लाखाहून अधिक वेळा पाहिलेला आहे. लोक या व्हिडिओद्वारे कार्यालयातील आनंदाचे वातावरण दर्शवितात असे म्हणत कौतुक करीत आहेत.