बहुजननामा ऑनलाइन टीम – लठ्ठपणामुळे अनेक गंभीर आजार होतात. जर तुम्हाला सुद्धा वजन कमी(Weight Loss) करायचे असेल आणि तुमच्याकडे जिममध्ये जाण्यासाठी वेळ नसेल, तर तुम्हाला घाबरण्याचे कारण नाही. फिटनेस एक्सपर्ट इमरान खाननुसार, वजन कमी(Weight Loss) करण्यासाठी आता जिममध्ये जाऊन घाम गाळण्याची गरज नाही. तुम्ही रोजची ही छोटी-छोटी कामे करून सुद्धा 100 पेक्षा जास्त कॅलरी बर्न करू शकता.
या आहेत त्या पद्धती
1) कपडे प्रेस करण्याचे काम करा. एक तासात तुम्ही 122 ते 183 कॅलरी बर्न करू शकता.
2) भांडी धुण्याचे काम करून तुम्ही एका तासात 122 ते 183 कॅलरी बर्न करू शकता.
3) एक तास कपडे धुण्याचे काम केले तर 125-173 कॅलरी बर्न होतात.
4) तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण एक तासापर्यंत छोट्या मुलांला उचलून खेळवलेत तरी 202 ते 302 कॅलरी बर्न होतात.
5) लादी साफ करण्याचे काम केल्यास तुम्ही 245 ते 370 पर्यंत कॅलरी बर्न करता.
6) जेवण बनवणे सुद्धा लाभदायक ठरू शकते. किचनमध्ये एक तास काम केले तर 144 ते 215 कॅलरी बर्न करण्यास मदत होते.
7) गार्डनिंगसुद्धा एक चांगला मार्ग आहे. यामुळे एक तासात 282 ते 442 पर्यंत कॅलरी बर्न होतात.
8) प्रत्येक दोन तासानंतर खा. पण शरीराच्या गरजेपेक्षा जास्त खाऊ नका. सर्व पोषक तत्व मिळतील असे पोषक खा.
9) खाताना टीव्ही पहात असाल तर ओव्हर इटिंग होणार नाही याची काळजी घ्या. यासाठी लक्ष ठेवा.
10) घाई-घाईत खाऊ नका. यामुळे लठ्ठपणासह अनेक समस्या होतात.
11) तनावात लोक जास्त खातात असे एक्सपर्ट म्हणतात. यासाठी नेहमी मित्र आणि नातेवाईकांसाबत जेवण करा.
12) वजन कमी करण्यासाठी पोट भरून नाष्टा करा. नाष्ट्यात प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करा.