बहुजननामा ऑनलाइन टीम – देशातील पर्वतीय राज्यांमध्ये बर्फवृष्टी (Weather Update)सुरू आहे, तर मैदानी प्रदेशांमध्ये थंडीच्या लाटेचा परिणाम दिसत आहे. उत्तर भारताच्या बहुतांश भागात थंडी वाढली आहे. राजधानी दिल्लीसह जवळपासच्या राज्यांच्या तापमानात घसरण सुरू आहे, तर दिल्लीच्या हवेत प्रदूषणाचा स्तर खूपच खराब श्रेणीत कायम आहे. हवामान विभागाने (आयएमडी) तमिळनाडु, पुदुचेरी, कर्नाटकमध्ये पावसाचा अलर्ट जारी केला आहे.
तमिळनाडु-पुदुचेरीमध्ये पावसाचा अलर्ट
तमिळनाडु आणि पुदुचेरीत चक्रीवादळ निवारच्यानंतरसुद्धा जोरदार पावसाचा अलर्ट आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागानुसार 29 नोव्हेंबरपासून बंगालच्या खाडीत एक नवीन कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्र यांनी म्हटले की, 29 नोव्हेंबरपासून तयार होत असलेल्या या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तमिळनाडुत जोरदार पाऊस होऊ शकतो.
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा बर्फवृष्टी, तापमानात घसरण
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा बर्फवृष्टी सुरू आहे. तापमानात विक्रमी घसरणीमुळे थंडीच्या लाटेची स्थिती कायम आहे, तर जम्मू-काश्मीरच्या बांदीपुरामध्ये रस्त्यावरून बर्फ हटवण्याचे काम सुरू आहे. बर्फवृष्टीमुळे वाहतूक ठप्प झाली आहे.
राजधानीची हवा आजसुद्धा ’खूप खराब’ श्रेणीत
राष्ट्रीय राजधानी दिल्लीच्या हवेत प्रदूषणाचा स्तर आजसुद्धा ’खूप खराब’ श्रेणीत आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या (सीपीसीबी) च्या आकड्यांनुसार आयटीओमध्ये एयर क्वालिटी इंडेक्स 186 श्रेणीत आहे.
दिल्लीत काही भागात हलक्या पावसाची शक्यता
हवामान विभागानुसार, ढग आल्याने दिल्लीच्या काही भागात शुक्रवारी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. यामुळे तापमानात आणखी घसरण झाल्याने थंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे.