Weather Alert : महाराष्ट्रासह ‘या’ 17 राज्यांमध्ये पावसाची शक्यता, जाणून घ्या पुढे कसे असेल हवामान

rain-rain

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हवामानात सध्या लागोपाठ चढ-उतार दिसून येत आहे. उत्तर भारत आणि देशाच्या अन्य भागात हलका पाऊस दिसून येत आहे, तर देशाच्या अनेक भागात पारा वाढू लागला आहे. हवामान विभागाने उत्तर प्रदेशाच्या अनेक भागात सुद्धा गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. उत्तराखंडच्या काही भागात सुद्धा वादळ आणि पावसासह गारा पडण्याचा अंदाज आहे. तिकडे, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीरसह अनेक भागात हवामान विभागाने बर्फवृष्टीचा इशारा दिला आहे. या राज्यांमध्ये हलका पाऊस होण्याची शक्यता सुद्धा आहे. तर मैदानी प्रदेशांमध्ये या आठवड्यात तापमानात घसरण जारी राहिल.

मागील दोन-तीन दिवसांपासून तयार झालेल्या पश्चिमी अव्यवस्थेच्या कमी प्रभावाच्या सिस्टममुळे मागील बुधवारी उत्तराखंडच्या नैनीतालमध्ये पाऊस झाला. येथे पश्चिमी हवेमुळे मैदानी प्रदेशात तापमान वाढलेले आहे. स्कायमेट वेदरनुसार एक कमजोर पश्चिमी स्थिती यावेळी हिमाचल प्रदेश आणि त्या लगतच्या भागांवर तयार झाली आहे. सोबतच एक चक्रीवादळी हवेचे क्षेत्र मध्य पाकिस्तान तसेच या लगतच्या पश्चिम राजस्थानच्या भागांच्या वर दिसत आहे. एक अन्य चक्रीवादळ सिस्टम मध्य भारतात मध्य महाराष्ट्राच्यावर दिसून येत आहे. या चक्रवादळी सिस्टममधून अंतर्गत कर्नाटकवरून केरळ किनारी भागापर्यंत पहिल्याप्रमाणेच एक ट्रफ रेषा सक्रिय आहे.

या राज्यांमध्ये पावसाची शक्यता
स्कायमेट वेदरनुसार पुढील 24 तासादरम्यान पूर्वोत्तर भारत, सिक्किम, पश्चिम बंगाल, बिहारच्या पूर्व आणि दक्षिण-पूर्व भागात, झारखंड, ओडीसा, छत्तीसगढ, पूर्व आणि दक्षिण-पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ, मराठवाडा, तेलंगना, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात सुद्धा काही ठिकाणी गडगडाटासह पाऊस होऊ शकतो. मध्य महाराष्ट्र, अंदमान व निकोबार बेटांवर सुद्धा एक-दोन ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो. उत्तर भारतात पवर्तांवर हालचाल पुढील 24 तासांत सुरू होऊ शकते. सर्वप्रथम पाऊस आणि बर्फवृष्टी जम्मू काश्मीर, गिलगिट बाल्टिस्तान, मुजफ्फरबाद आणि लडाखमध्ये दिसू शकते. 24 तासानंतर हवामानाची हालचाल आणखी वाढू शकते.